मंडे टू मंडे चा दणका; खिर्डी ते बलवाडी रोड वरील साईड पट्टया बुजविण्याचे काम आज पासून सुर !
खिर्डी ता,रावेर (प्रतिनिधी)। बलवाडी रस्त्याने ४-५महिने पासून साईड पट्टी खोदून ठेवलेली असल्याने वाहन चालकांना समोरा समोर वाहन आल्यास एक मेकांना साईड देण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने वाहन चालकांनी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत संताप व्यक्त केला या संदर्भातील “मंडे टू मंडे” वृत्तपत्रांत वृत्त प्रसारीत झाल्याने यांची दखल घेतली आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, बलवाडी रस्त्याने ४-५महिने पासून साईड पट्टी खोदून ठेवलेली असल्याने वाहन चालकांना समोरा समोर वाहन आल्यास एक मेकांना साईड देण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने अनेक वेळा वाहन चालकांच्या प्रसंगावधनामुळे अपघात टळत आले. सदर ठिकाणी पावसाळ्यात रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याने त्या ठिकाणी खड्डा पडला आहे की,काय असा प्रश्न पडतो.वाहन चालकांनी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत संताप व्यक्त केला होता या संदर्भात मंडे टू मंडे ने बातमी प्रकाशित केली होती सदर मंडे टू मंडे या वृत्त पत्रा मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीची सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित दखल घेऊन अखेर कामाला आज पासून सुरूवात करण्यात आली आहे.