” मंडे टू मंडे “च्या वृत्ताची कंत्राटदाराकडून दखल..
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी)। सध्या निंभोरा ते खिर्डी या रस्त्यावर उड्डाण पुलाचे काम सुरू असल्याने त्या ठिकाणी रस्त्यात मातीचे ढिगारे असल्याने उडणाऱ्या धुळीमुळे वाहन चालकांना खूप त्रास होत असून तसेच शेतकऱ्यांच्या पिकाला सुध्दा याचा फटका बसत होता
या बाबत 6 मार्च रोजी निंभोरा ते खिर्डी रस्त्यावर पसरले धुळीचे साम्राज्य या मथळयाखाली” मंडे टू मंडे ” ने प्रकाशित केलेल्या बातमीची त्वरित दखल घेत कंत्राटदार यांनी मातीचे ढिगारे जेसीबीच्या सहाय्याने इतर ठिकाणी उचलून टाकण्याचे त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले लागलीच कामाला सुरुवात करून त्या ठिकाणी साफसफाई करण्यात आली असून नागरिकांची व दुचाकी वाहन चालकांची होणारी गैरसोय टाळण्याात आली असल्याने अनेकांना या धुळीमुळे सर्दी, खोकला, घशात दुखणे, धाप लागणे असे त्रास होत असल्याने वेळीच उपाययोजना करण्यात आल्याने ” मंडे टू मंडे” या वृत्तपत्राचे आभार व्यक्त करण्यात आले.
प्रतिक्रिया– रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मातीचे ढिगारे मुळे धुळ निर्माण झाल्याने रस्ता पार करताना खूप अडचणीचा सामना करावा लागत असे. माती इतर ठिकाणी टाकण्यात आली असून रस्ता मोकळा झाल्याने जणू काही धुळ च गायब झाली की काय असे वाटू लागले आहे. –माहिती अधिकार कार्यकर्ते भिमराव कोचुरे