मनवेल येथील काँक्रीटीकरण रस्त्याचे काम रखडले ?
यावल (सुरेश पाटील)। आ.चद्रंकात सोनवणे यांच्या प्रयत्नांने मंजुर झालेल्या यावल तालुक्यातील मनवेल येथील गांवाकडुन तर थोरगव्हाण गांवाकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रीटीकरण काम रखडल्यामुळे वाहन धारकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.
साकळी गांवापासून तर शिरागड पर्यत माजी आमदार चद्रंकात सोनवणे यांचा प्रयत्नांने अकरा कि.मी. अंतर असलेल्या रस्त्याचे काम डांबरीकरण पुर्ण झाले तर मनवेल गांवातील बसस्टँण्ड पासुन तर थोरगव्हाण गांवाकडे जाणाऱ्या रस्ता डांबरीकरण न करता काँक्रीटीकरण करण्यात येत असुन रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असताना मात्र कम अचानक रखडले असल्यामुळे काम बंद झाले असुन मुख्य ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे त्याच ठिकाणी रस्त्याचे काम बंद झाल्यामुळे वाहन धारकांमध्ये मोठा तीव्र संताप व्यक्त होत आहे.
रस्त्याचे काम मुख्य वळण रस्त्यावर रखडले आहे त्या ठिकाणी यावल येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्याना गांवातील लोकांनी तक्रारी केल्यावर हि तसदी घेत नसल्यामुळे अधिकाऱ्याच्या मनमानी कारभार दिसून येत आहे. त्याच प्रमाणे साकळी रस्त्याचे काम निकृष्ट झाले असुन रस्त्यावर साईड पट्ट्या भरण्यासाठी वांरवार सागुनही साईड पट्ट्या मृत्यू च्या सापड्यात अडकल्या आहे. रस्त्याचे रखळल्या कामाकडे अधिकाऱ्यानी भेट देऊन रस्त्याची मोजणी करून रखडलेला रस्त्याचे काम पुर्ण करावे अशी मागणी जोर धरत आहे.