मनाला चटका लावुन देणारी घटना ! जळगाव जिल्हा भाजपा शोकाकुल : मनमिळाऊ राजकारणी हरपला !
जळगाव – राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(RSS) ते भाजपा 2 वेळा आमदार, 2 वेळा खासदार असा जीवनातील यशस्वी प्रवास करणारे जिल्ह्याचे भाजप नेते माजी खासदार तथा जिल्हाध्यक्ष हरी भाऊ जावळे यांचे दुःखद निधन झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे
गेल्या काही दिवसांपासून ते मुंबई येथे उपचारार्थ रुग्णालयात होते. उपचार घेत असताना त्याची 12:30 च्या सुमारास प्राण ज्योत मावल्याने त्याचे निधन झाले आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचे श्वास घेतला. ते 60 वर्षाचे होते. दोन वेळा खासदार आणि दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते त्यांच्या कुटुंबात आई पत्नी एक मुलगी दोन मुले असा परिवार आहे.त्यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मध्ये एकच शोककळा पसरली आहे हरिभाऊ यांचे 3 जून रोजी को रो ना पॉझिटिव्ह रिपोर्ट आले होते त्यांना उपचारासाठी मुंबई येथील मुंबई हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते .
त्याच्या निधनाने भाजप सह राजकीय पक्षांना मध्ये अस्वस्थता पसरलेली असून एका संघर्षवादी नेत्याच्या अंत झाल्याचे दुःख व्यक्त केले जात आहे. सर्व जिल्ह्यासह परिसरात निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र शोक कळा परासरली आहे