भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

मरीमातेच्या बारागाड्यां उत्सवाला कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थगिती !

फैजपूर (प्रतिनिधी)। दक्षिण बाहेरपेठ भागातील पुरातन काळातील मरिमातेचे जागृत देवस्थान असलेल्या यात्रेनिमित्त सालाबादाप्रमाणे फैजपूर शहरात परंपरागत पध्दतीने मोठ्या उत्साहात ओढल्या जाणाऱ्या बारागाड्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आल्याने १२२ वर्षांची परंपरा यंदा खंडित होणार आहे.मारिमातेचे यात्रोउत्सवाला १२१ वर्षाची अखंड परंपरा चालत आली आहे. फैजपुरसह परिसरातील भाविक भक्तगण दर्शनासाठी शहरात दाखल होतात. दरवर्षी श्रावण महिन्यात शुल्क दकादशी मंगळवारी या दिवशी बारागाडया उत्साह पूर्ण वातारणात शहरातील अंक्लेशवर – बुऱ्हाणपूर महामार्गावरील म्युनिसिपल हायस्कूल ते सुभाष चौक अशा ओढल्या जातात यावेळी फैजपूर शहरासह परिसरातील हजारो भाविक बारागाड्या उत्सवसाठी हजेरी लावतात दरम्यान बारागाड्या ओढल्या गेल्यानंतर गावातील राममंदिर येथे बारागाडया उत्सवसाठी सहकार्य करणाऱ्या व प्रतिष्ठित नागरिकांचा बारागाड्या उत्सव समिती कडून सत्कार केला जातो.

मात्र, १२२ वर्षांपासून अखंड पणे फैजपूर शहरात साजरा करण्यात येत असलेला बारागाड्या उत्सव प्रथमच कोरोना संसर्गजन्य आजारामुळे सालाबादप्रमाणे परंपरागत पध्दतीने साजरा केला जाणारा बारागाड्या उत्सव यावर्षी उद्या दि २८ मंगळवार रोजी स्थगित करण्यात आल्याने १२१ वर्षांपासूनची परंपरा प्रथमच खंडित होणार आहे याविषयी भगत संजय कोल्हे यांचेशी संपर्क साधला असता यावर्षी कोरोना संसर्गजन्य आजारामुळे बारागाड्या स्थगित करण्यात आले आहे केवळ मरिमाता देवस्थान येथे पूजा करण्यात येईल असे सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!