महसुल राज्यमंत्र्यास कोरोनाची लागण !
मुंबई: महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना आता महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली असून यांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारनंतर ते घरीच उपचार घेत आहेत. सत्तार हे सध्या होम आयसोलेशनमध्ये आहेत. काल शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांचादेखील कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी दौरा केला आहे. यामुळे ते अनेकांच्या संपर्कात आले होते..
थोडी शंका आली होती म्हणून आज कोरोना तपासणी केली,दुर्दैवाने रिपोर्ट पॉजीटीव्ह आली आहे परंतु घाबरण्याची आवश्यक्ता नाही,कोरोना प्रादूर्भावाच्या काळात अनेक ठिकाणी मदतकार्य करतांना चुकून प्रादुर्भाव झाला असेल परंतु आपल्या आशीर्वादाने मी लवकरच बरा होऊन परत आपल्या सेवेत तत्पर होईल.
— Abdul Sattar (@AbdulSattar_99) July 21, 2020