भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलरावेर

महसूल दिनाचे औचित्य साधून यावल रावेर तालुक्यातील महसूल अधिकारी कर्मचारी यांना उत्कृष्ट कर्मचारी म्हणून प्रमाणपत्र वाटप !

यावल (प्रतिनिधी)। उपविभागीय अधिकारी कार्यालय फैजपूर अंतर्गत यावल रावेर तालुक्यातील ज्या काही महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट शासकीय काम केले त्यांना आज दिनांक 1 ऑगस्ट 2020 शनिवार रोजी महसूल दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवर अधिकारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले आले.

महसूल दिनाचा शुभारंभ द्विप प्रज्वलनाने करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर आमदार श्री दादा चौधरी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले रावेर तहसीलदार हुशार आणि देऊनी यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर सौ.थोरबोले ( पाडळसे प्रा.आ.केंद्र अधिक्षक ) उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक यावल तहसीलदार जितेन्द्र कुंवर यांनी करून यावल तालुका महसूल विभागातील कामाचा थोडक्यात आढावा उपस्थितांसमोर सादर केला. आमदार शिरीषदादा चौधरी, उपजिल्हाधिकारी प्रवीण महाजन, प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले, यावल तहसीलदार जितेंद्र कुंवर, रावेर तहसीलदार सौ. उषाराणी देवगुणे यांच्या हस्ते यावल तालुक्यातील चिखली बुद्रुक येथील कोतवाल सुरेश रामदास तायडे, मस्कावद येथील कोतवाल महेंद्र उल्हास चौधरी, यावल तहसील कार्यालयातील शिपाई बाळू काळू पाटील, रावेर तहसील कार्यालयातील शिपाई सुनील मधुकर सोनार, उपविभागीय अधिकारी कार्यालय फैजपूर येथील शिपाई योगेश भागवत केदारे, यावल तहसील कार्यालयातील वाहनचालक हिरामण माणिक सावळे, यावल तालुक्यातील गिरडगांव येथील पोलीस पाटील अशोक रघुनाथ पाटील, रावेर तालुक्यातील निंबोल येथील पोलीस पाटील योगेश पाटील, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील वन जमीन संगणक सहाय्यक कलेश डी.हातकर, न्हावी प्र.यावल येथील तलाठी श्रीमती लीना कुंदन राणे, रावेर तलाठी दादाराव विठ्ठलराव कांबळे, यावल तहसील कार्यालयातील लिपिक सुयोग दिलीप पाटील, रावेर तहसील कार्यालयातील लिपिक शिवकुमार लोलपे, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील लिपिक अमोल वासुदेव चौधरी, यावल तालुक्यातील साकळी मंडळ अधिकारी पाटीलबा आबाजी कडनोर, रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील मंडळ अधिकारी प्रमोद भगवान टोंगळे, यावल तहसील कार्यालयातील इंदिरा गांधी योजना अव्वल कारकून रवींद्र भगवान मिस्‍तरी, रावेर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक हर्षल विश्वनाथ पाटील,फैजपुर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून रशिद तडवी, यावल तहसील कार्यालयातील निवडणूक नायब तहसीलदार राहुल बी सोनवणे, रावेर तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार संजय ऊखर्दू तायडे, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार महेश यशवंत साळुंखे यांचा समावेश असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामकाजाबद्दल प्रमाणपत्र देण्यात आले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!