महापुरुषांचा पुतळा हटवण्याची पद्धत निंदनीय; पुतळा पूर्ववत बसवण्याची राष्ट्रवादीची मागणी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (अक्षय काठोके)। राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तर्फे आज दि 20/1/2021 रोजी काल निमखेडी येथे झालेल्या घटनेच्या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आले ..
मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द येथे बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज्यांचा पुतळा ज्या पद्धतीने काढण्यात आला ती पद्धत अत्यंत निंदनीय व चुकीची होती, सदर घटनेचा निषेद राष्ट्रवादी युवक कांग्रेस तर्फे नोंदवण्यात आला.. मराठा समाज्याचा युवकांवर ज्या पद्धतींने गुन्हे दाखल करून युवकांना फसवण्यात आले ते अत्यंत निंदनीय आहे. युवकांवर दाखल झालेले गुन्हे तात्काळ मागे घेऊन विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज्यांचा पुतळा पूर्ववत बसवण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी तर्फे तीव्र स्वरूपाचे जेल भरो आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रशासनला देण्यात आला ..
निवेदन देते वेळी ईश्वर भाऊ राहणे, जिल्हा उपाध्यक्ष ऍड पवन पाटील , तालुका उपाध्यक्ष सोनू भाऊ पाटील , भागवत दाभाडे , शुभम पाटील , देवानंद भोई , निलेश पाटील ,गंभीर घोगरे , योगेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी युवक चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ..