Video। मुक्ताईनगर मध्ये महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर अहिंसायात्रेचे आगमन.
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुक्ताईनगर (प्रतिनिधी)। मुक्ताईनगर शहरामध्ये महावीर जयंतीच्या पार्श्वभूमीवर अहिंसा यात्रेचे सदभावना, नैतिकता, नशामुक्ती असा संदेश देत आगमन झाले,आचार्य,श्री. महाश्रमनजी व त्यांच्या सोबतचे जैन समाजाचे गुरू महाराज एकूण 70 असे आहेत.याचे मुक्ताईनगर सकल जैन समाजातर्फे स्वागत उस्फुर्त स्वागत करण्यात आले.
आतापर्यंत आचार्य, श्री महाश्रमनजी व त्यांच्या सोबतचे गुरुमहाराज यांनी भूटान, नेपाळ व त्यानंतर परतीचा प्रवास भारतामध्ये करत आहे.असे एकूण आज पर्यंत 50 हजार किलोमीटरचा प्रवास पायी चालत चालत शांततेचा, अहिंसेचा संदेश देत तिन्ही राष्ट्रांमध्ये देत आहे.आज महाराष्ट्र मधून ते पुढे मध्यप्रदेश कडे रवाना होतील. बुऱ्हाणपूर,इंदोर त्यानंतर भीलवाडा कडे जातील.अशी माहिती सकल जैन समाज बांधव यांनी दिली.तसेच सकल जैन समाजातर्फे आज महावीर भवन येथे भगवान महावीर जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .यावेळी उपस्थित सकल जैन समाज बांधव,माजी महसूल मंत्री, एकनाथ खडसे. आमदार, चंद्रकांत पाटील.खासदार, रक्षा खडसे.जिल्हा बँक चेअरमन, रोहिणी खडसे खेवलकर.यांनी सर्वांनी आचार्य श्री महाश्रमणजी यांचे दर्शन घेतले.