मोदी सरकारच्या मोठ्या निर्णयाने चीनसह पाकला आणखी एक दणका !
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन यांच्यात तणाव आहे. सीमेवर कुरापती करणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी आधी अॅपवर बंदी घातील होती. आता मोदी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले जात असताना आता मोदी सरकारने चीनला प्रथमच थेट दणका दिला आहे.
आता मोदी सरकारने देशाची सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षेला मजबूत करण्याच्या दृष्टीने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता यापुढे भारताशी जमीनीने जोडल्या गेलेल्या कोणत्याही देशातील कंपनीला राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील सरकारी खरेदीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी होता येणार नाही. यासंदर्भात अर्थ मंत्रालयाने एक आदेश जारी केला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा चीन, पाकिस्तान, बांगलादेश, भुटान, नेपाळ या सर्व देशांवर परिणाम होणार आहे. सरकारी खरेदीमध्ये नेहमी चीनी कंपन्या आघाडीवर असतात. मोदी सरकारचा हा नियम राज्य सरकारांना देखील लागू असेल. यासाठी केंद्राने घटनेचे कलम २५७(१) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या सीमा ज्या देशांसोबत जोडल्या गेल्या आहेत. त्या सर्व देशांना हा नियम लागू होतो. अशा देशातील एखादी व्यक्ती किंवा संस्था कोणत्याही सरकारी खरेदी बोली लावणार असेल तर त्याला परराष्ट्र व्यवहार, गृह मंत्रालयाकडून परवानगी घ्यावी लागले.