मोदींचे देशाला उद्देशून संबोधन, नागरिकांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा
येत्या नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत देशातील ८० कोटींहून अधिक लोकाना मोफत धान्य देण्याची महत्त्वाची घोषणा आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. देशाला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली.
नवी दिल्ली:
पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा विस्तार दिवाळी आणि छटपूजेपर्यंत म्हणजेच नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत लागू करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. पुढील ५ महिन्यांसाठी ८० कोटीहून अधिक गरीब नागरिकांना ५ किलो गहू किंवा ५ किलो तांदूळ मोफत दिले जातील, या बरोबर प्रत्येक कुटुंबाला १ किलो चणे दिले जाणार. पावसाळ्यात आणि त्यानंतर मुख्यत: कृषी क्षेत्रात अधिक काम होत असते. जुलैपासून हळूहळू सणाचे दिवस येतात.
संपूर्ण देशात एका रेशनकार्ड योजना लागू करणार
केंद्र सरकार आता संपूर्ण देशात एक रेशनकार्ड योजना लागू करणार आहे. या पुढे कोणताही व्यक्ती कोठूनही आपले रेशन प्राप्त करू शकतो, असे पंतप्रधान म्हणाले. गरीब, गरजवंतांना जर सरकार मोफत धान्य देत असेल तर त्याचे श्रेय देशातील शेतकरी आणि प्रामाणिक करदात्याना जाते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
देशात आपण वेळेत लॉकडाउन सुरू केल्यामुळे आमची स्थिती जगातील इतर देशांच्या तुलनेत चांगली आहे. नियमांचे पालन केलेच पाहिजे. जे लोक नियमांचे पालन करत नाहीत त्यांनी टोकावे लागेल, रोखावे लागेल, असे मोदी म्हणाले.
सार्वजनिक ठिकाणी मास्क न घातल्यामुळे एका देशाच्या पंतप्रधानालाही दंड भरावा लागला आहे. भारतात देखील स्थानिक प्रशासनाने अशीच सतर्कतेने काम केले पाहिजे. हे १३० कोटी लोकांचे रक्षण करण्याचे अभियान आहे. भारतात संरपंच असो की देशाचा पंतप्रधान असो, कोणीही नियमांच्या वर नाही, असे पंतप्रधान म्हणाले.
‘स्वावलंबी भारतासाठी दिवसरात्र एक करू’
देशातील १३० कोटी जनतेला एकत्र येऊन काम केले पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर आपण स्वावलंबी भारत बनवू शकू. यासाठी आपणा सर्वांना एकत्र येत दिवसरात्र काम
‘अनलॉक-१ पासून देशात निष्काळजीपणा वाढला’
अनलॉक १ सुरू झाल्यापासून देशात जरा बेजबाबदारपणा वाढला असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त केली. हा निष्काळजीपणा हा चिंतेचा विषय असल्याचेही मोदी म्हणाले. प्रतिबंधित क्षेत्रावर विशेष लक्ष द्यावेच लागेल असेही मोदी पुढे म्हणाले.
आणखी काय म्हणाले मोदी:
कुण्या गरिबाच्या घरात चूक पेटू नये अशी स्थिती येऊ नये.
पंतप्रधान गरीब कल्याण योजना – पावणे दोन लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले गेले
३ महिन्यात २० कोटी जनधन खात्यात ३१ हजार कोटी रुपये जमा केले गेले आहेत- ९ कोटी शेतकरी १८ हजार कोटी रुपये जमा झालेले आहेत.
पंतप्रधान रोजगार अभियानही राबवण्यात येत आहे. यावर ५० हजार कोटी रुपये खर्च करत आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा८० कोटीहून अधिक लोकांना तीन महन्यांचे रेशन मोफत दिले गेले. प्रत्येक कुटुंबाला दरमहा १ किलो डाळही देण्यात आली आहे.