भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यामहाराष्ट्रशैक्षणिक

या विभागातील अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत; उदय सामंत यांची महत्त्वाची घोषणा

परिक्षांच्या बाबतीत संभ्रम असणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा गोंधळ शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दूर केला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी राज्य शासनाच्या फेसबुक पेजवरून केले्या लाईव्हच्या माध्यमातून तीन प्रमुख विषयांवरील निर्यण जाहीर केले. यामध्ये बीए, बीएएसस्सी आणि बीकॉमच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार नसल्याचेही उदय सामंत सांगितले. शिवाय एटीकेटी संदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल, असेही उदय सामंत म्हणाले.

या तीन विषयांवर घेतला निर्णय 

शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी फेसबुक लाईव्हमध्ये दिलेल्य माहितीनुसार काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये अनेक विषयांपैकी शिक्षण विषयावरही चर्चा करण्यात आली. काल राज्याच्या आपत्कालिन विभागाच्या कमिटीची बैठक पार पडली असून त्यामुळे राज्याचे मुख्य सचिव, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय सामंत यांनी सांगितले.

दरम्यान अव्यावसायिक, व्यावसायिक आणि एटीकेटी परिक्षांबाबतच्या निर्णयाची माहिती त्यांनी दिली. पहिला निर्णय मागील सर्व सत्रांमध्ये उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम सत्रातील वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन विद्यापीठाने योग्य ते सूत्र वापरुन त्यांचा निकाल जाहीर करावा हा होता. याचा अर्थ असा की ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे, त्यांनी तसे लेखी विद्यापीठाला द्यायचे आहे. ज्यांना परीक्षा द्यायची नाही त्यांनीही विद्यापीठाला लेखी द्यायचे, आहे असेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. या सगळ्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून त्यांना पदवी प्रदान केली जाईल, असेही सामंत म्हणाले. तसेच ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांचे टाईमटेबल काही दिवसात जाहीर करू. त्यांच्याबाबत कोविडची परिस्थिती बघून तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, ही परीक्षा ऐच्छिक घेण्यात येईल, असेही सामंत म्हणाले. एटीकेटी असलेल्या विद्यार्थ्यांबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेणार असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!