भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

यावल तालुक्यात अवैध सावकारांची दादागिरी, 5 महिन्यात सावकाराने दिले बेकायदा 17लाख रुपये रोख, आयकर विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष !

यावल (सुरेश पाटील)। शेतकरी आत्महत्या प्रकरणी गेल्या आठवड्यात यावल तालुक्यात फैजपुर पोलीस स्टेशनला एका सावकारासह त्याच्या 2 मुला विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यात अवैध सावकारांबाबत सर्वस्तरातून चिंताजनक चर्चा सुरू झाल्या आहेत,तसेच अनेक सावकारांचे पंटर हे सतत अधिकाऱ्यांच्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहुन शेतकऱ्यांवर नागरिकांवर आपला प्रभाव टाकून लाखो रुपयांच्या रोख स्वरूपाच्या रकमा अनधिकृत रित्या,बेकायदा गरजू शेतकऱ्यांना आणि नागरिकांना देऊन बेकायदेशीर लेखी व्यवहार करून त्यांच्या शेतजमिनी,चारचाकी,दुचाकी वाहने स्वतःच्या ताब्यात घेऊन नंतर खरेदी करून घेण्याचा सपाटा यावल तालुक्यात सुरू आहे याकडे आयकर विभागासह जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जळगाव विभागाचे,पोलीस यंत्रणेचे,अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये मोठा तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

हिंगोणा येथील 37 वर्षीय कांचन किसन राणे या तरुण शेतकऱ्याने गांवातील खाजगी सावकाराच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी गेल्या आठवड्यात गुरुवारी फैजपुर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणामुळे हिंगोणा गांवातील आणखी एक सावकारी प्रकरण चव्हाट्यावर येणार असल्याचे हिंगोणा परिसरात बोलले जात आहे.याबाबत एका झालेल्या व्यवहाराचे कागदपत्र, खरेदीखत प्रत्यक्ष बघितले असता खरेदी करताना सावकाराचा एक मध्यस्थी हा स्वतः खरेदीखत करतेवेळी साक्षीदार झालेला आहे एका गरजवंत शेतकऱ्याला त्याचे शेत खरेदीखत करताना खरेदीखताचा भरणा दिनांक 1/9/2019 रोजी 5 लाख.2/10/2019रोजी 5 लाख,
3/11/2019रोजी 5 लाख,
29/1/2020रोजी 2 लाख,
असा एकूण 17 लाख रुपयांचा रोख भरणा शेत खरेदी करणाऱ्या एका महिलेने एका गरजवंत शेतकऱ्याला रोख स्वरूपात 17 लाखाची रक्कम दिली आहे.

या झालेल्या शेत खरेदीच्या व्यवहारात वरील तारखेला लाखो रुपयाची म्हणजे 17 लाख रुपयांची रोख रक्कम कोणत्या नियमाने गरजवंत शेतकऱ्याला देण्यात आली आहे शेतकऱ्याला रोख रक्कम देताना बँकेत त्याच्या खात्यावर भरणा का केलेला नाही ? शेत खरेदी करणाऱ्याने शेतकऱ्याला चेक द्वारे किंवा ड्राफ्ट द्वारे 17 लाखाची मोठी रक्कम का देण्यात आलेली नाही ? किंवा शेती खरेदी करतेवेळी दुय्यम निबंधका समोर वरील रोख रक्कम का दिलेली नाही ? कोणालाही एका वेळेला 5 लाख रुपये आणि एकूण 17 लाख रुपये रोख स्वरूपात देता येतात का ? याबाबत अनेक कायदेशीर प्रश्न उपस्थित केले जात असून हे प्रकरण सुद्धा अवैध सावकारी म्हणून होते किंवा कसे याबाबत लवकरच जनतेसमोर वस्तुस्थिती समोर येणार आहे. शेत खरेदी करणाऱ्या व्यक्तीने वेळोवेळी 17 लाख रुपये रोख रक्कम दिली कशी याबाबतची लेखी तक्रार आयकर विभाग कार्यालय जळगाव तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालय जळगाव यांच्याकडे भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यास जळगाव जिल्हा मा.संघटक सुरेश जगन्नाथ पाटील रा. यावल हे करणार आहेत.

यावल तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध सावकार अवैधरित्या सावकारीचा गोरखधंदा अनधिकृतरित्या करून दादागिरी करीत गरजवंत शेतकरी आणि नागरिकांकडून नोकरदारांना कडून अव्वाचे सव्वा व्याज वसूल करीत लोकांची प्रॉपर्टी, शेत जमिनी,चारचाकी दुचाकी वाहने हडप करीत आहेत. तालुक्यात काही खाजगी लायसन्स धारक सुद्धा सावकार आहेत, यातील काही ठराविक लायसन धारक सावकार सुद्धा नागरिकांकडून अव्वाच्या सव्वा दराने व्याज वसूल गरजवंत यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक करीत आहेत,काही धनाढ्य सावकारी प्रवृत्तीचे नफेखोर हे सुद्धा अधिकृत रित्या फायदेशीर गरजवंतांची गरज भागविण्यासाठी शेत जमिनीचे किंवा प्लॉटचे खरेदी खत (मोठी रक्कम परत मिळाल्यानंतर खरेदीखत पुन्हा परत करून देण्याच्या बोलीवर) करून मोठमोठ्या लाखो रुपयाचा रकमा देऊन आपली चांदी करून घेत आहेत,यात खरेदीखत पुन्हा परत पलटवून देण्यासाठी गरजवंताची अडवणूक करून पाहिजे ती रक्कम घेऊन शेतकऱ्यांच्या ताब्यात पुन्हा त्याची शेती जमीन परत केले जात आहे.

यात शेतकरी आणि इतर सर्व स्तरातील नागरिकांची मोठ्या स्वरुपात आर्थिक पिळवणूक होत असून अनेक जण सावकाराच्या जाचास कंटाळून परस्पर आत्महत्या करीत आहेत पोलिस स्टेशनला तक्रार जात नसल्याने गुन्हे सुद्धा दाखल होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. बरेच सावकारांचे पंटर हे पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधीच्या सतत संपर्कात राहत असल्याने त्यांच्या प्रभावामुळे सावकारा विरोधात कोणी तक्रार करण्यास गेला असता तक्रारदाराचे कोणीही ऐकून घेण्यास तयार होत नाही शेवटी सावकाराच्या जाचास कंटाळलेला गरजवंत शेतकरी, नागरिक किंवा एखादा नोकरदार आपली मौल्यवान प्रॉपर्टी एक तर सावकाराच्या घशात घालतो नाही तर आत्महत्या करून घेतो अशी यावल तालुक्यात वस्तूस्थिती निर्माण झाली आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस निर्णय घेऊन अवैध व अनधिकृत सावकारांन विरुद्ध संयुक्तीक मोहीम राबवून कडक कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!