यावल तालुक्यात तीन रुग्ण बाधित फैजपुरातील एकाचा समावेश !
फैजपूर ता.यावल (प्रतिनिधी) । यावल तालुक्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असल्याने दिसून येत असून आज तालुका प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवाला नुसार ३ अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.
आज आलेल्या अहवाला मध्ये तालुक्यातील ३ रुग्णांमध्ये फैजपुर शहरातही पुन्हा एका ४९ वर्षीय पुरुष रुग्णांचा समावेश असून सदरील रुग्ण तहा नगर मधील अल उमर दवाखान्या मागील परिसरातील रहिवासी आहे फैजपुर येथील बाधित रुग्ण संख्या ६९ झाली असून त्या ३ मयत आहेत तर ३ उपचार घेत आहे. तसेच परसाडा गावांतील १ व डोंन गावातील १ अशे तीन अहवाल बाधित असल्याचे तालुका प्रशासनाला प्राप्त झाले आहे, सदरील वृत्तास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे व फैजपुर येथील मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.