यावल तालुक्यातील टाकरखेडा ग्रामपंचयंतीत पेयजल योजनेत दहा लाखाच्या निधीची अफरातफर
कोरपावली ता.यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील टाकरखेडा येथील ग्राम पंचायतीच्या भ्रष्ट व भोंगळ कारभारामुळे भारत निर्माण योजनेअंतर्गत होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा बट्टयाबोळ झाल्याने, कामाची देखरेख करणाऱ्या बोगस समितीची सखोल चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी गावातील जेष्ट समाजीक कार्यकर्ते गोरख तानु पाटील यांनी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे लिखित तक्रारी व्दारे केली असुन चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा ईंशारा दिला आहे.
गौरख पाटील यांनी दिलेल्या तक्रार निवेदनात म्हटले आहे की केन्द्र शासनाच्या महत्वकांशी भारत निर्माण पेयजल योजना ही२o०७ या वर्षी बनावट कागदपत्रांचा आधार घेवुन ११ सदस्यांची पाणी पुरवठा व स्वच्छता समिती गठीत करण्यात आली होती या समितीच्या गठनासाठी घेण्यात आलेली ग्राम सभा ही गावात नसलेल्या ग्रामस्थांना ग्रामसभेला उपस्थिती मध्ये नांव घेवुन बनावट सह्या करून ग्रामसभा झाल्याचे दाखविण्यात आले . अशा प्रकारे लेखा समितीचे अध्यक्ष सचिव अनिल महाजन यांच्या सहकार्याने अशा ६ ग्रामसभा घेवुन शासनाचा ३ लाख५० हजार रुपये अनुदान मंजुर करून शासकीय निधीचे आपआपल्या मर्जीनुसार खर्च केले आहे . दिनांक २६ / ०१ / २o०७या एकाच दिवशी सर्व ठराव नमुद करून गावाची व शासनाची दिशाभुल केली असल्याची या तक्रारीत म्हटले आहे.
भारत निर्माण पेयजल योजनेची मान्यता मिळण्याकरीता गठीत समितीने सर्व प्रकारच्या चुकीच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून कारभार चालविला असुन , दिनांक २ ६ / ०१ / २००९ रोजी गैर मार्गाने सभा घेवुन कोणतेही काम न करणाऱ्या ठेकेदारास २ लाख८५ हजार रूपये रक्कम ही रोखीने अदा केली .समिती व्दारे होणारी भारत निर्माण पेयजल योजनेच्या कामात शासकीय नियमांची पायमल्ली करून वारेमाप अवैध मार्गाने खर्च दाखवुन देखील सदरच्या जलकुंभाचे काम अत्यंत निकृष्ठ व अर्धवट अवस्थेत मागील आठ ते दहा वर्षापासुन पडुन असुन या अशा बोगस व निकृष्ट प्रतिच्या कामामुळे या भारत निर्माण पेयजल योजने साठी शासनाची दिशाभुल करून मिळवलेले ११ लाख५० हजार रूपये खर्चाच्या योजनेसाठी समितीच्या अध्यक्ष शारदा महाजन व सचिव अशोक महाजन तथा लेखा समितीचे अध्यक्ष सरपंच यांचे पती अनिल महाजन यांच्या व्दारे बनावट कागदपत्रांचा आधार घेवुन सुमारे १० लाख रुपये खर्च दाखवुन सुद्धा अद्यापपर्यंत काम हे अपुर्ण अवस्थेत आहे . समितीने स्वताः च्या आर्थीक स्वार्थासाठी योजनेचे निरिक्षण करणारे अधिकारी यांना हाताशी धरून शासनाच्या डोळ्यात धुळफेक करून आर्थीक गैरव्यवहार करणाऱ्या समितीची तात्काळ निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी टाकरखेडा तालुका यावल येथील जेष्ठ सामाजीक कार्यकर्ते गोरख तानु पाटील यांनी एका लिखितपत्राद्वारे तक्रार केली आहे. ३१ डिसेंम्बर पर्यंत या कारभाराची चौकशी न झाल्यास आपण यावल पंचायत समिती समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा ईशारा त्यांनी दिला आहे .