यावल

यावल न.पा.अटी-शर्तीचे उल्लंघन; अतिरिक्त साठवण तलाव निर्मितीत घोळ

मंडे टू मंडे विशेष वृत्तसेवा-

येथील नगर परिषदेच्या१४ व्या वित्त आयोगाअंतर्गत अतिरीक्त साठवण तलाव निर्मितीच्या कामासाठी २६ ऑक्टोबर रोजी निवीदा जाहिर करण्यात आली असुन ३ कोटी ५ लाखाच्या कामांसाठी काढलेल्या निवीदा प्रक्रीयेत अटी शर्तीचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून येत आहे. निवीदेचा घोळ झाला असुन ही प्रक्रीया थांबवावी अन्यथा न्यायालयात दाद मागणार असल्याची तक्रार शिवाजी बाविस्कर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पुराव्यानिशी केली आहे.

शासनाच्या नियमानुसार निवीदा मागवितांना दर, अनामत रक्कम, ईसारा रक्कम याबाबत शासनाने मार्गदर्शन तत्वे ठरवून दिली आहे. सुचनेनुसार निवीदा संच संकेतस्थळावर अपलोड करणे बंधणकारक आहे.मात्र या गोष्टी निवीदा प्रक्रीयेत पाळण्यात आल्या नसून फक्त निवीदा सुचना पत्र व करावयाच्या बाबी याच अपलोड करण्यात आल्या आहे.या निवीदेत कामाचे तांत्रिक सल्लागार आर.एस.महाजन हेच स्वत: काम करण्याबाबत अनेक लोकांकडे चर्चा करत आहे.त्यामुळे यावल शहराच्या पाणीपुरवठा योजनेच्या महत्वाच्या कामात मोठा गैरव्यवहाराचे नियोजन केल्याचे आरोप तक्रारीमध्ये करण्यात आले आहे.
नियमानुसार निवीदा प्रक्रीया राबवावी त्यात सर्व निवीदा शर्ती,कामाचे रेखाचित्र, निवीदे अंतर्गत करावयाच्या बाबी व त्यांचे दर सर्व उपलब्ध करूनच निवीदा काढण्यात यावी अशीे तक्रार करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!