यावल येथे दोन ट्रक मध्ये गोवंश जातीचे चामडे, 4 आरोपींना अटक; भुसावळ विभागात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल (सुरेश पाटील)। यावल नगरपरिषद कार्यालय,यावल न्यायालय तसेच ऐतिहासिक किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हडकाई नदीपात्रात गोवंश जातीचे चामडे एकूण 465 नग यांच्यासह दोन ट्रक असा एकूण 14 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल आज यावल पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकारी आणि दोन पंच यांच्यासमक्ष जप्त करून चार संशयितांविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून यावल पोलिसांनी संबंधित चार आरोपींना अटक केली.
कुठेतरी गोवंश जातीच्या प्राण्याची कत्तल करून त्या चामड्यान मीठ लावून प्रोसेस करून ट्रक मध्ये भरले जात असल्याची गुप्त खबर आज सकाळी अकरा ते बारा वाजेच्या सुमारास यावल पोलिसांना मिळाल्याने पोलीस निरीक्षक सुधीर पाटील हे आपल्या पोलीस पथकासह तात्काळ घटनास्थळी जाऊन कार्यवाही केली,त्यांच्यासोबत पीएसआय जितेंद्र खैरनार, हेडकॉन्स्टेबल असलम,पोलीस शिपाई सुशील घुगे,भूषण चव्हाण, राजेश वाडे इत्यादी पोलिस कर्मचारी होते
संपूर्ण भुसावळ विभागात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई यावल पोलिसांनी केली असल्याचे बोलले जात आहे–
राहुल रतन चौधरी पोलीस अंमलदार यांनी यावल पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी1) सय्यद सुभान सय्यद बिलाल वय 47 राहणार डांगपुरा यावल, 2)मोहम्मद इमरान मोहम्मद इकबाल राहणार सुप्रीम कॉलनी जळगाव,3) शेख चाँद शेख इजाजुल रा. पीलखाना शिवाजीनगर हावडा कोलकाता 4)नवाब आलम मेहबूब आलम रा.पीलखाना शिवाजीनगर हावडा कलकत्ता यांनी आज दि.27/2/2021 सकाळी 12:15 वाजेच्या सुमारास यावल शहरात हडकाई नदीचे पात्रात मालवाहू ट्रक क्रमांक एमएच19जेड 0934 यामध्ये एकूण अंदाजे 165 गोवंश जातीचे चामडे एका चामड्याची किंमत 200 रुपये प्रमाणे 33 हजार रुपयाचे तसेच ट्रकची किंमत अंदाजे 4 लाख रुपये तसेच दुसरा एक मालवाहू ट्रक क्रमांक WB–11–D–3686 यामध्ये एकूण 300 गोवंश जातीचे चामडे एकाच चामड्याची किंमत 200 रुपये प्रमाणे एकूण 60 हजार रुपये व ट्रक ची किंमत 10 लाख रुपये असा एकूण 14 लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल व गोवंश जातीचे चामडे यावल पोलिसांनी पशुवैद्यकीय अधिकारी व दोन पंचांसमक्ष जप्त केले.
या कारणावरून दोन्ही वाहनांमध्ये वाहतूक करण्यासाठी त्यावरील चालक मोहम्मद इमरान मोहम्मद इकबाल व शेख चांद शेख इजाजुल, राहणार- पीलखाना ,शिवाजीनगर ,हावडा कोलकोता व क्लिनर नवाब आलम मेहबूब आलम राहणार पीलखाना शिवाजीनगर हावडा कलकत्ता यांनी चामड्याच्या व्यापाऱ्यास मदत केले म्हणून त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5,5 (ब) 9 व 11 प्रमाणे कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला असून चारही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.