यावल शहर व तालुका शिवसेने तर्फे अभिनेत्री कंगना राणावतचा तीव्र निषेध, यावल तहसीलदार यांना दिले निवेदन !
यावल (सुरेश पाटील)। हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री कंगना राणावतने महाराष्ट्र व मुंबई पोलिसांबाबत खोडसाळ वक्तव्य केले त्या वक्तव्याचा आणि अभिनेत्री कंगना राणावतचा यावल शहर व तालुका शिवसेनेतर्फे आज दिनांक 5 शनिवार रोजी तिव्र शब्दात निषेध व्यक्त करीत यावल तहसीलदार जितेंद्र कूवर यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले.
तहसीलदार जितेन्द्र कूवर यांच्याकडे शिवसेनेतर्फे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की अभिनेत्री कंगना राणावत हिने संतापजनक वक्तव्य केले आहे. याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी तिस खडेबोल सुनावले आहेत. मुंबई पोलीस व महाराष्ट्र राज्य शासन यांच्या बाबत कंगना राणावत हिने अविश्वास व्यक्त करीत जे खोडसाळ वक्तव्य केले त्याचा यावल शहर व यावल तालुका शिवसेनेतर्फे तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात येत असून कंगना राणावत हिच्या विरुद्ध तात्काळ कडक कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. दिलेल्या निवेदनावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख मुन्ना उर्फ तुषार पाटील, यावल शहर प्रमुख जगदिश कवडीवाले, युवासेना यावल शहर प्रमुख सागर देवांग, उपजिल्हा संघटक दीपक बेहेडे, तालुका उप संघटन सुनील उर्फ पप्पू जोशी, आदिवासी सेल तालुकाप्रमुख हुसेन तडवी, उप तालुकाप्रमुख आर.के. चौधरी सर, महिला शहर संघटक सपना घाडगे, सौ.सोळुके,दुर्गा कोळी, रूपाली शंकर, प्रसिद्धीप्रमुख प्रमुख संतोष वाघ, शहर संघटक पिंटू कुंभार, सुनील बारी, सचिन कोळी, युवा सेना सरचिटणीस विजय पंडित, सागर बोरसे. इत्यादी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्वाक्षरी केली आहे.