राजकारणात खळबळ; यावल पंचायत समिती आणि शिक्षण क्षेत्रात लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रवेश !
यावल (प्रतिनिधी) दि.30 । यावल तालुक्यात आज दिनांक 30 रोजी सकाळी फैजपूर येथे 4, साकळी येथे 7, मनवेल येथे 1 अट्रावल येथे 1 असे एकूण 13 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने तसेच साकळी गांवात एकाच कुटुंबातील 6 जण कोरोना पॉझिटिव आढळून आल्याने आणि या 13 रुग्णांमध्ये यावल पंचायत समिती मधील तसेच शिक्षणक्षेत्रात संबंधित एक लोकप्रतिनिधीचा समावेश असल्याचे समजते राजकारणासह संपूर्ण यावल तालुक्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे, संबंधित लोकप्रतिनिधीचा रोजचा दांडगा जनसंपर्क आणि बैठक असल्याने त्यांच्या संपर्कात शेकडो ग्रामस्थ कार्यकर्ते आले असल्याने आरोग्य हिताच्या दृष्टीने मोठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.