राज्यातील शाळा दिवाळीनंतरच सुरू होणार– शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
मुंबई (वृत्तसंस्था)। कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कोरोनादरम्यान जरी शालेय शिक्षण बंद असले तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. मात्र राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार आहे, असे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
तसेच ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच बैठक घेणार आहेत. या बैठकीत विद्यार्थी हिताचा निर्णय होईल असंही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.तसेच राज्य सरकार कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. ९ वी ते १२ वीचे विद्यार्थी हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त सजग असल्याने आणि त्यांचे शैक्षणिक वर्ष महत्त्वाचे असल्याने त्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्याबाबत आधी विचार होईल, असेही वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शाळा बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शालेय शिक्षणाचे वर्ष १५ जूनला ऑनलाइन पद्धतीने सुरु करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मात्र शाळा सुरु झाल्या नाहीत. आता दिवाळीनंतर शाळा टप्प्याटप्प्याने सुरु करण्याचा विचार राज्य सरकारचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.