रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर
रावेर, मंडे टू मंडे न्युज वृत्तसेवा । रावेर कृषी उपन्न बाजार समिती निवणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जागावाटप करण्यात आले असून राष्ट्रवादी ८ जागा, कॉग्रेस ७ जागा तर शिवसेना ठाकरे गट ३ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहे.
रावेर कृषी उपन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणूक महाविकास आघाडीचे अधिकृत शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली प्रचार शुभारंभ कार्यक्रम व मतदार पदाधिकारी कार्यकर्ते मेळावा ओंकारेश्वर येथे घेण्यात आला व येथून प्रचाराचे नारळ फोडण्यात आले.
महाविकास आघाडीचे उमेदवार खालील प्रमाणे– सोसायटी मतदार संघातुन: डॉ. राजेंद्र पाटील (मोरगाव), किशोर चौधरी (खिरोदा), पंकज राजिव पाटील ऐनपुर, राजेंद्र पंढरीनाथ चौधरी (खिरवड), लक्ष्मण बाबूराव मोपारी (खिरोदा), मंदार मनोहर पाटील (धामोडी), योगिराज गबाजी पाटील (मोरगाव),
ओबीसी मतदार संघातुन– सचिन रमेश पाटील (चोरवड), एनटी मतदार संघातून– जयश राजेंद्र कुवटे (अटवाड़े), महीला मतदार संघातून– शारदा हेमराज पाटील (रायपुर), मनिषा सोपान पाटील (दोधे), ग्राम पंचायत मतदार संघातून– कैलास विठ्ठल सरोदे (मस्कावद), योगेश ब्रीजलाल पाटील (मुंजलवाडी), ग्राम पंचायत आर्थिक दुर्बल संघातून– पांडुरंग शिवदास पाटील (अजंदा)
एसटी मतदारसंघ– कामिल तडवी (पाल), व्यापारी मतदार संघ– विलास श्रावण चौधरी; रोहीत अनिल अग्रवाल हमाल-मापाडी संघातू– सय्यद अजगर सय्यद तुकडू
यामेळाव्याला आ शिरीष चौधरी, माजी आमदार अरुण पाटील, राष्ट्रवादीच्या नेत्या अॅड रोहिणी खडसे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, भागवत महाजन, राजिव पाटील, राजिव रामदास महाजन, रमेश पाटील व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा