रावेर तालुक्यात आज १३ रुग्णांना कोरोनाची बाधा !
रावेर (प्रतिनिधी)। आताच नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार तालुक्यात आता पर्यंत तालुका प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये १३ अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहेत. रावेर शहरात कोरोना प्रभाव वाढत अल्याचे दिसत आहे.
तालुका प्रशासनाला प्राप्त आज आलेल्या अहवालामध्ये रावेर शहरांतील सर्वाधिक ४ रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून त्याखालोखाल सावदा शहरातील १, केऱ्हाळा ४, उदळी १, खिर्डी बु. १, गहूखेडा १, भातखेडा १ अशे अहवाल तालुका प्रशासला बाधित आढळून आल्याचे प्राप्त झाले आहे. तालुक्यात बाधितांची दिवसागणित वाढती संख्या चिंतेत भर घालणारी असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या ६६२ झाली आहे. सदरील वृत्तास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.एन डी महाजन व डॉ. शिवराज पाटील यांनी दुजोरा दिला आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.