आरोग्यरावेर

रावेर तालुक्यात २२ जणांना कोरोनाची लागण !

रावेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील तपासणी अहवाल प्राप्त झाले असून तालुक्यात आता पर्यंत तालुका प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये १४ व सावदा शहरातील ८ अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहेत.

तालुका प्रशासनाला प्राप्त आज आलेल्या अहवालामध्ये तांदलवाडी १०, थोरगव्हान २, केऱ्हाळा १, चिनावल १, अशा रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचे तालुका प्रशासनाकडून सांगण्यात आले असून तसेच सावदा शहरातील ८ जणांची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली आहे. या मध्ये एका माजी नगरसेवकांसह कुटुंबातील व्यक्तींचा समावेश आहे. तालुक्यातील आतापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या १२७८ झाली आहे. सदरील वृत्तास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज पाटील व सावदा नगरपालिका प्रशासनाने दुजोरा दिला  आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!