रावेर तालुक्यातील १० कोरोना तपासणी अहवाल बाधित !
रावेर (प्रतिनिधी)। आताच नुकत्याच हाती आलेल्या माहिती नुसार तालुक्यात आता पर्यंत तालुका प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये आज १० अहवाल बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहेत.
तालुका प्रशासनाला प्राप्त आज आलेल्या अहवालामध्ये खिर्डी बुद्रु येथील ६, रावेर ३, भोकरी १ अशा रुग्णांना कोरोनाची लागण झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले असून खिर्डी गावांत संसर्ग वाढत असल्याचे दिसत आहे. खिर्डी गावांतील बाधित रुग्ण संख्या २४ झाली असून त्यातील ७ रुग्ण उपचार घेत आहेत, तालुक्यातील आतापर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या ७४१ झाली आहे. सदरील वृत्तास तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवराज पाटील व निंभोरा वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन पाटील यांनी दुजोरा दिला आहे.