भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेर

रावेर पत्रकार संघातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबिर; १४ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

रावेर (प्रतिनिधी)। महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार रावेर तालुका संघाच्या वतीने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिरात रावेर तालुक्यातील खिरवड, दोधा, नेहता, पुनखेडा, पातोंडी, रावेर, शिंदखेडा, ऐनपूर, मोरगाव, अजनाड, खानापूर, रसलपूर, विवरे,भाटखेडा, उटखेडा, कुंभारखेडा, सावखेडा, वडगाव, निंभोरा सह अनेक खेड्यातील गरजूंनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

रावेर येथे कांताई नेत्रालयाच्या सौजन्याने गरजूं रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली, तर 12 रुग्णांची मोतीबींदुची शस्त्रक्रिया होणार आहे.
रावेर येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृह कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर येथे आयोजित कांताई नेत्रालयाचे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे खान्देश माळी महसंघाचे तालुका अध्यक्ष मुरलीधर उर्फे पिंटु महाजन, फुले,शाहू,आंबेडकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र अटकाळे, युवासेनेचे सचिव जयेश पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ रावेर तालुकाध्यक्ष विलास ताठे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व शहराध्यक्ष विनोद रामचंद्र कोळी,रितेश दुबे ,आंबा ड्रायव्हर आदि प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.या मान्यवर मंडळी यांनी सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.

कांताई नेत्रालय यांचे तर्फे दर महिन्याच्या १० तारखेला पुणे अंधजन मंडळ व भवरलाल आणि कांताबाई जैन फाऊंडेशन व्दारा पुरस्कृत कांताई नेत्रालय यांचे तर्फे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर चिकित्सक डॉ.वैभव चौधरी व कांताई नेत्रालयाचे शिबिराचे कॅम्प मॅनेजर युवराज देसर्डा यांच्या प्रमुख भूमिकेतून रावेर येथे घेतले जाते,यांनी आज शिबिरार्थीची तपासणी करुन त्या पैकी 12 रुग्ण मोतीबींदूच्या शस्त्रक्रियेसाठी दिनांक 11 मार्च सकाळी 7 वाजेला घेऊन जाणार आहे.
हे यशस्वितेसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ रावेर तालुकाध्यक्ष विलास ताठे, उपाध्यक्ष संतोष नवले,योगेश सैतवाल कार्याध्यक्ष,महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ जिल्हा प्रसिद्धी प्रमुख व शहराध्यक्ष
विनोद रामचंद्र कोळी,शेख शरीफ ,शेख अजीज, सद्दाम पिंजारी, गणेश पाटील, अनिल मानकरी, सह सर्व रावेर तालुका पत्रकार बंधूनी परिश्रम घेतले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!