महाराष्ट्रराजकीय

राष्ट्रवादीत भूकंपाची शक्यता, पार्थ पवार घेणार मोठा निर्णय? ‘ऑपरेशन लोटस’ची सुरुवात पवारांच्या घरातून?

मुंबई (वृत्तसंस्था)। पार्थ पवार यांच्याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या विधानानंतर पार्थ पवार कमालीचे अस्वस्थ असून काही मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. असा दावा पार्थ पवार समर्थकांन कडून केला जातोय. सध्याची राजकीय स्थिती बघता निर्णय घेण्याची ही योग्य योग्य वेळ असल्याचं देखील बोललं जातं आहे. शरद पवारांनी जाहीरपणे फटकारल्यानंतर पार्थ यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.

पार्थ पवार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. नुकतंच खासदार सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत पार्थबद्दल अनेक चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पार्थ वेगळा मार्ग निवडणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आजोबांविरोधात नातू मोठा निर्णय घेणार का? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहे.

महाराष्ट्रात भाजपचं ऑपरेशन लोटस सुरु?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या घडामोडींमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघालं आहे. शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना प्रसारमाध्यमांसमोर अपरिपक्व म्हटल्यानंतर राष्ट्रवादीतील शरद पवार आणि अजित पवार हे दोन नेते समोरासमोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणावर अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पार्थ पवार कोणताही निर्णय आपल्या वडिलांना विचारल्याशिवाय घेऊ शकत नाही. दुसरीकडे राणे कुटुंबाने पार्थ पवार यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे भाजपकडून ऑपरेशन लोटस हे महाराष्ट्रात सक्रीय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!