रोझोदा येथे एकाच परिवारातील ४ अहवाल कोरोना बाधित, २ चिमुकल्यांचा समावेश !
रोझोदा ता.रावेर (प्रतिनिधी)। जिल्ह्यासह रावेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसतं आहे आज आलेल्या कोरोना तपासणी अहवालात रोझोदा गावातील ४ रुग्ण कोरोना बाधित आढळून आली आहे.
आज आलेल्या कोरोना तपासणी अहवालात गावांतील एकाच परिवारातील ४ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळून आले आहे, त्यात ३ महिला वय २७ वर्षीय व २८ वर्षीय महिलेसह एक ४ वर्षीय मुलगी तसेच ७ वर्षीय मुलाचा समावेश असून सदरील सर्व भारंबे वाडा परिसरातील रहिवासी असून गावकऱ्यांची चिंता वाढली आहे. रुग्ण राहत असलेल्या परिसर निर्जंतुक करून सील करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. सदरील वृत्ताने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.