रोझोदा येथे एकाच परिवारातील १ महिला व १ पुरुष कोरोना बाधित !
रोझोदा ता.रावेर (प्रतिनिधी)। जिल्ह्यासह रावेर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसतं आहे काल रात्री उशिरा आलेल्या कोरोना तपासणी अहवालात रोझोदा गावातील २ रुग्ण कोरोना बाधित आढळून आली आहे.
गावांतील आलेल्या कोरोना तपासणी अहवालात गावांतील एकाच परिवारातील २ जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे आढळून आले आहे, त्यात १ महिला वय ५६ वर्षीय व २५ वर्षीय पुरुषचा समावेश असून सदरील वृत्ताने गावकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.