भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावलसामाजिक

“लक्ष्मी” चित्रपटावर बंदी आणावी….हिंदू जनजागृती समितीतर्फे तहसीलदारांना निवेदन

यावल (सुरेश पाटील)। ‘लक्ष्मी’ हा चित्रपट 9 नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित होणार असून यामध्ये अभिनेता अक्षय कुमार हे मुख्य भूमिकेत आहेत. यापूर्वी या चित्रपटाचे नाव लक्ष्मी बॉम्ब असे होते हिंदूंच्या जोरदार विरोधानंतर शबीना खान आणि तुषार कपूर निर्मित या चित्रपटाच्या नावात तोंडदेखला बदल करून आता या चित्रपटाचे नाव लक्ष्मी असे करण्यात आले आहे .नावात जुजबी पालट करत हिंदूंच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे व या चित्रपटाला हिंदू समाजाने विरोध करण्यामागे लव्ह जिहादला चालना आणि हिंदूंच्या धर्मभावनाच्या अवमान ही दोन प्रमुख कारणे होती .चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांनी या दोन्ही कारणांना बगल दिली आहे या आशयाचे निवेदन हिंदू जनजागृती समिती, यावल यांच्यातर्फे तालुक्याचे नायब तहसीलदार पवार यांना देण्यात आले .

लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाच्या नावामुळे श्री लक्ष्मीचे विडंबन होत असल्याने हिंदू जनजागृती समितीने त्यासंदर्भात केंद्रशासन , राज्य शासन व अनेक चित्रपट परिनिरीक्षण मंडळाना निवेदनही दिले आहे. चित्रपटाच्या नावातून केवळ बॉम्ब हा शब्द काढून टाकल्याने श्री लक्ष्मी देवीचा अनादर रोखला जात नाही. नावात पालट केल्यामुळे चित्रपटातील देवीशी संबंधित संदर्भ रहित झाले असे होत नाही हा चित्रपट श्री लक्ष्मीदेवी व देव देवीची महती सांगणारा किंवा दिवाळीशी संबंधित असता तर चित्रपटाचे नाव लक्ष्मी ठेवण्याचे कारण समजू शकलो असतो मात्र चित्रपटाच्या आणि श्री लक्ष्मीदेवीचे महतीचा अजिबात संबंध नसल्याचे चित्रपटाच्या अधिकृत ट्रेलरवरून स्पष्ट होते, असे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे .

चित्रपटाच्या अधिकृत ट्रेलरमध्ये आसिफ या नावाने मुसलमान व्यक्तिरेखा साकारत असलेले अभिनेते अक्षय कुमार यांच्या शरीरात एका तृतीयपंथीयांचे भूत संचारल्याचे दाखवण्यात आले आहे .अभिनेता देवी प्रमाणे मोठे लाल कुंकू लावून केस मोकळे सोडून हातात त्रिशूल घेऊन नाचताना दाखवले आले असून कुटुंबातील व्यक्तींना त्रास देण्यासाठी जाते तेव्हा कुटुंबातील व्यक्ती हिंदूंच्या विविध देवतांची चित्र पुढे करतात मात्र भूत त्याला जुमानत नाही असे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले असल्याचे हिंदू जनजागृती समितीचे म्हणणे आहे. चित्रपटात नायकाचे नाव आसिफ आणि नायिकेचे नाव प्रिया असे आहे . चित्रपट कंचना या दक्षिण भारतीय चित्रपटाचा रिमेक असून त्यामध्ये नायकाची व्यक्तिरेखा मुसलमान नाही तरी हिंदी चित्रपटात नायक मुसलमान तर युती हिंदू धर्मीय दाखवण्यात आली असून यातून हेतुतः लव्ह जिहादला प्रोत्साहन दिले असून अत्यंत गंभीर अक्षम्य असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले. नुकतेच हरियाणातील निकिता तोमर हिची तौसीफ या धर्मांधांने गोळ्या घालून हत्या केल्याचे प्रकरण ताजे असताना अशा प्रकारचे चित्रपट निर्मिती करणे म्हणजेच दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे कुटील डाव चित्रपटसृष्टीचा दिसून येतो तरी हिंदूंच्या भावना समजून सदर चित्रपटावर लवकरात लवकर बंदी आणावी असे निवेदनात म्हटले आहे .

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर लक्ष्मी या नावाने चित्रपट बनवणारे कधी ईदच्या निमित्ताने अल्लाह किंवा पैगंबर , नाताळच्या पार्श्‍वभूमीवर जिझस किंवा येशु या नावाने विनोदी चित्रपट बनवण्याचे धाडस दाखवतील का ? चित्रपट परिनिरीक्षण मंडळ अशा नावाना मान्यता देईल का ? जर आपल्या देशात अन्य धर्मीयांच्या भावनांचा आदर केला जातो तर हिंदूंच्या धार्मिक भावनाचा आदर का केला जात नाही ? असा प्रश्न हिंदू समाजाच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे, सदर निवेदन देतेवेळी हिंदू जनजागृती समितीचे चेतन भोईटे , हिंदू समाज पार्टी चे राहुल कोळी, कुलदीप राजपूत, बजरंग ग्रुप बोरावल खुर्द , कैलास पाटिल, निलेश माळी हे उपस्थीत होते.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!