लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार,रावेर पोलीसात गुन्हा दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर,मंडे टू मंडे वृत्तसेवा। मध्यप्रदेशातील एका गावातील २० वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवत पाल येथे अत्याचार केल्याची धक्कादायक घडना उघडकीला आली रावेर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यप्रदेशातील २० वर्षीय तरूणीची तालुक्यातील पाल येथील गुलाम रसुल नवाज तडवी (वय-२५) याच्याशी नाशिक येथे मजूरीसाठी गेलेले असताना ओळख झाली. नंतर एकमेकांशी मोबाईलवर संपर्क झाला. तीन महिन्यापुर्वी गुलाम तडवी याने पिडीत मुलीला २ जूनरोजी भेटण्यासाठी बोलाविले. मुलगी रावेर येथे भेटण्यासाठी आली. गुलाम तडवी याने मुलीला दुचाकीवर बसवून पाल येथील त्याच्या घरी नेले . तेथे लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. ही गोष्ट घरच्यांना सांगितली तर जीवे ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पुन्हा ९ सप्टेंबररोजी देखील पिडीत तरूणीवर अत्याचार केला.
पिडीत तरूणीने मध्यप्रदेशातील छीपाबड पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात तक्रार दिली. तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा रावेर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. अद्याप संशयित आरोपीला अटक झालेली नाही. पुढील तपास डीवायएसी विवेक लावंड करीत आहे.