लाँकडाऊन काळात विज बिलाचे हफ्ते कमी करा अप्पा प्रतिष्ठान रस्त्यावर येणार !
मलकापूर (प्रतिनिधी)। येथे लाँकडाऊन काळात विज बिलाचे हफ्ते कमी करा अन्यथा अप्पा प्रतिष्ठान रस्त्यावर येईल असा इशारा प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतनभैया जगताप यांनी आज शुक्रवारी दिला आहे.
यासंदर्भात महावितरणचे कार्यकारी अभियंता महावीतरण यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे. की कोरोना संसर्गामुळे आधीच संपूर्ण देश धास्तावला आहे. त्याच विदर्भाच प्रवेशद्वार हायस्पाँट झाले आहे. त्यामुळे परिस्थिती दिवसेंदिवस अतिशय वाईट होत आहे.
अशा परिस्थितीत सामान्य माणसाला दोन वेळचे जिवन कसे मिळवायचे हा प्रश्न आहे. त्यामुळे मलकापूरात जनता हवालदिल झाली आहे. त्यामुळे तीन महीन्याचे थकीत बिल रध्द केल्यास जनतेला आधार मिळेल. अशी मागणी अप्पा प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतनभैय्या जगताप यांनी केली आहे. त्या निवेदनावर चंद्रकांत साळुंके, विश्वास जाधव, रोहन जगताप, विनायक राजापूरे,आकाश आगलावे, अंबादास गावंडे, विशाल घुले,प्रशांत जगदाळे, स्वप्नील साळुंके, विशाल मापारी ,पवन शेरेकर,लखन चव्हाण, गौरव देवकर यांची नांवे अंकीत आहेत.
“”खर तर वीज बिलाविषयी मला जास्त बोलता येणार नाही .मागणी रास्त आहे त्या विषयाचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येईल..
अनिल शेगावकर उपविभागीय अभियंता महावितरण कंपनी मलकापूर