लाकडाऊन काळातील व्यापारी संकुलनाचे भाडे व घरपट्टीची ५०% रक्कम माफ करावी– शिवसेनेची मागणी
सावदा (प्रतिनिधी) :- कोरोना व्हायरस च्या संसर्गा मूळे गेल्या सहा महिन्यांपासून संपूर्ण राज्यात लाकडाऊन सुरू असल्याने अनेकांची कामे बंद पडली संपूर्ण व्यवहार बंद असल्याने हाताला काम नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली घरपट्टी भरणे नाकेनऊ झाली घरपट्टी भरणे शक्य नसल्याने शहरातील १९-२० ची घरपट्टीच्या मुळ रकमे पैकी ५० % रक्कम व थकीत रकमेवरील व्याज कमी करण्याची , तसेच शहरातील नगरपरिषदेच्या मालकीच्या सर्व व्यापारी संकुलाचे कोरोना लॉक डाऊन काळातील ४ महिन्याचे भाडे व १९ -२० या वर्षाचा कर व थकीत रकमेवरील व्याज माफ करावे अशा प्रकारचे निवेदन सावदा पालिकेचे मुख्यधिकारी सौरभ जोशी यांना सावदा शिवसेनेच्या वतीने देण्यात आले.
लॉकडाऊन सुरू झाल्या पासून हाताला काम मिळाले नाही जे मिळाले त्यावर फक्त पोट भरण्या पुरतेच मजुरी हाती आल्याने सन १९ -२० ची घरपट्टी कराची मुळ एकमे पैकी ५० % रक्कम माफ करावी व थकीत रकमेवरील व्याज माफ करावे . नगरपालिकेचे सर्व व्यापारी संकुल नगरपालिकेने सांगितल्याप्रमाणे लॉकडाऊन काळात चार महिने दुकाने बंद होती त्यामुळे त्याचे व्यवहार बंद होते. याचे सुध्दा १९ -२० चे चार महिन्याचे दुकान भाडे व वार्षिक टॅक्स तसेच थकीत रकमेवरील व्याज माफ करावे व सावदा शहरातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी केलेली मागणी लवकरात लवकर मान्य करावी अन्यथा शिवसेना नगरपालिकेवर मोर्चा काढेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला असुन निवेदनावर शहरप्रमुख मिलींद सुरेश पाटील, सचिव शरद भारंबे, शाम पाटील, धनंजय चौधरी, भरत नेहेते, गौरव भेरवा यांच्या सह्या असून या निवेदनाच्या प्रति ना.एकनाथ शिंदे , नगरविकास मंत्री महाराष्ट्र राज्य, ना.गुलाबराव पाटील पालकमंत्री जळगांव, चंद्रकांत पाटील आमदार मुक्ताईनगर, मा.जिल्हाधिकारी सो.जळगांव यांना पाठवण्यात आल्या आहेत,