लॉकडाउन काळातही खाजगी फायनांस कंपन्याच्या एजंट दलालांचा धुमाकुळ !
रावेर (प्रतिनिधी)। तालुक्यात गेल्या ४ ते ५ महिन्यांपासुन खाजगी फायनांस कंपन्याच्या एजंट दलालांचा धुमाकुळ सुरु असल्याने आदिवासी गावांमधील कर्ज खातेदार,नागरिक व महिला खुप वैतागले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,लॉकडाऊन काळात RBI ने सुरवातीला मार्च ते मे अशी तीन महीने EMI स्थगिती दिली होती,त्याकाळातही खाजगी फायनांस कंपन्यांनी EMI वर अवाढव्य व्याज आकारत हप्ते वसुली ही थर्ड पार्टी चा वापर करत दादागिरीने गोरगरिब महिलांकडुन EMI ची वसुली केली जात आहे ,नंतर RBI ने परत ३ महिन्यांची EMI स्थगिती वाढवल्याने असा एकुण ६ महिन्यांची EMI स्थगितीचा दिलासा सर्वसामान्यांसाठी दिला होता,परंतु कोरोनाच्या पार्श्वभुमीवर इतकी बिकट परिस्थिती असल्यावरही काही खाजगी फायनांसच्या दलालांनी त्यांचे कमिशन कमावण्यासाठी खुप धुमाकुळ घालुन सक्तीने कर्ज वसुली केली जात असल्याचे चिञ परिसरात दिसत आहे,या खाजगी फायनांसच्या एजंटांना वारंवांर विणवण्या करुन देखील फायनांस कंपन्यांच्या दलालांनी त्यांची नोकरी जाऊ नये,या हेतुने खेड्यापाड्यातील गोरगरिब मजुर महिलांना धमकावुन EMI चे हप्ते वसुल केले आहेत आणि केले जात आहेत. RBI ने ६ महिन्यांची EMI स्थगिती दिली, याचा पुरेपुर फायदा शहरी भागांना मिळाला,माञ जिथे १०० रुपये रोजंदारीने महिलांना मजुरी कधीतरी मिळते, अशा या ग्रामीण भागांंत माञ EMI स्थगिती असल्यावरही वसुली माञ सुरुच राहिली,नुसते नावाला लॉकडाऊन आणि EMI स्थगिती दाखवण्यात आली आहे,असे तालुक्यातील जनतेकडुन बालले जात आहे, तरी या संपुर्ण प्रकाराकडे संबधित RBI च्या अधिकाऱ्यांनी ग्रामीण भागातील जनतेवर ,महिलांवर होणारा अन्याय थांबवावा,EMI वर आकारलेले व्याज माफ करावे,आणि खाजगी फायनांस कंपन्यांकडुन EMI भरण्याची मुदतवाढ मिळावी,अशी रास्त स्वरुपाची मागणी रावेर तालुक्यातील कर्जदार महिला,व कर्जदार नागरिकांकडुन संबधित विभागाकडे करण्यात आली आहे..