क्राईमजळगाव

वरणगाव मध्ये मुद्देमालासह 19 लाखाचा गुटखा जप्त

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

वरणगाव ( प्रतिनिधी )।मध्यप्रदेशातून जळगाव जिल्ह्यात चोरट्या मार्गाने विमल पान मसाला आणि सुगंधी पान मसाला गुटख्याची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चार जणांना वरणगाव परिसरात पोलीसांनी छापा टाकून सुमारे १८ लाख ९६ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला,

चोरट्या मार्गाने जळगाव जिल्ह्यात विमल पान मसाला आणि सुगंधी पान मसाला मध्यप्रदेशातून वरणगाव मार्गे येत असल्याची माहिती वरणगाव पोलीसांना मिळाल्याने २४ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास पोलीसांनी सापळा रचून बोलेरो वाहनाची तपासणी केली असता चार जण सुमारे १४ लाख ९६ हजार रूपयांचा गुटखा वाहून नेत असल्याचे आढळून आले यात रियाज अलि लियाकत (वय-३०) रा. नशिराबाद, गणेश नथ्थू चव्हाण रा. नशिराबाद सिकंदर कुमार लालदेव सनी (वय-२०) रा. बिहार ह.मु. नशिराबाद, यांना पोलीसांनी ताब्यात घेतले असून एक फरार झाला आहे. त्यांच्या ताब्यातील ४ लाख रूपये किंमतीचा बोलेरो आणि मुद्देमाला असा एकुण १८ लाख ९६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला असुन चार जणांवर वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपअधिक्षक नितीन गणपुरे करीत आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!