वाळू ट्रॅक्टर पकडल्याने मध्यस्थी आला चव्हाट्यावर !
यावल (सुरेश पाटील)। आज दिनांक 12 बुधवार रोजी यावल शहरातून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलीस उपनिरीक्षक यांनी पकडल्याने तसेच गेल्या चार दिवसापूर्वी यावल पोस्टेला जप्त केलेले वाळू ट्रॅक्टर ट्रॉली मध्यस्थीने रातोरात बदलून त्या ठिकाणी दुसरी ट्राली आणून उभी करून दिल्याची तसेच यावल पोलिसांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना घडल्याने यावल पोलीस उपनिरीक्षक यांनी त्या एका खाजगी पंटर /मध्यस्थीची चौकशी करून दंडात्मक फौजदारी कार्यवाही करावी असे संपूर्ण वाळू वाहतूक धारांमध्ये बोलले जात आहे.
आज सकाळी अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलीस उपनिरीक्षक यांनी पकडून यावल पोलीस स्टेशनला पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतले आहे यामुळे तसेच अवैध वाळू वाहतुक करीत असताना बोरावल( गेट )येथील तुषार नामक खाजगी पंटर यावल पोलिसांना बघून घेईल या नांवाखाली बाळू वाहतूकदारांकडून परस्पर हप्ते वसूल करुन वाळू वाहतूकदार आणि यावल पोलिसांची शुद्ध दिशाभूल करून आपला आर्थिक हेतू साध्य करून घेत असल्याचे उघडकीस आले आहे पोलिसांच्या नांवावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या कडून खाजगी पंटर हप्ते गोळा का करतो? याची चौकशी यावल पोलिसांनी करून कड़क कार्यवाही करावी तसेच पोलीस निरीक्षक अरुण धनवडे आणि पीएसआय यांनी आपल्या अधिकृत पोलीस कर्मचाऱ्यां मार्फत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचा कडक बंदोबस्त करावा असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.