वाळू माफियांची दादागिरी ,न्हावी गावाजवळ प्रांताधिकाऱ्यांच्या वाहनाला डंपर ने धडक
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
फैजपूर (प्रतिनिधी)। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या माफियाचा पाठलाग करताना फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलक यांच्या शासकीय वाहनाला वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने पळून जाण्याच्या प्रयत्नात जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना काल दिनांक 24 बुधवार रोजी रात्री उशिरा यावल तालुक्यातील न्हावी गावाजवळ घडली.
सविस्तर माहिती अशी की फैजपूर उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी बुधवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास बेकायदेशीर वाळूची वाहतूक होत असल्याची गुप्त खबर मिळाल्याने त्यांनी आपल्या शासकीय वाहनातून चालकासह एका वाळू डंपरचा पाठलाग यावल किनगाव दरम्यान केला मात्र अंधाराचा फायदा घेत वाळू डंपर किनगाव भागात पळून जाण्यात यशस्वी झाला तेथून परत येताना प्रांताधिकारी यांना न्हावी गावाजवळ एक वाळू वाहतूक करणारा डंपर दिसला,त्यांनी या डंपरचा पाठलाग केला असता डंपर सुसाट वेगाने न्हावी गावातील अरुंद रस्त्या असलेल्या गल्लीत शिरला तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या डंपर चालकाने डंपर मागे घेतांना शासकीय वाहनाला पुढून जोरात धडक/ठोस देऊन गाडीचे मोठे नुकसान केले या घटनेत वाहनचालक यास केलेल्या ओढाताणीत वाळूमाफियांनी धक्काबुक्की सुद्धा केली असून त्यांना काही प्रमाणात मुक्का मार लागलेला आहे.या प्रकरणात डंपरला संरक्षण देणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या कारसह डंपरला ताब्यात घेण्यात आले आहे सुसाट वेगाने डंपर चालवणाऱ्या तरुणाला सुद्धा फैजपूर पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अवैध वाळूची कोणती वाहतूक कशी होत आहे हे सर्व काही सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून समजत असले तरी काही सर्कल ,तलाठी याचे वाळू माफियाशी अर्थ पूर्ण संबंध असल्याने अनधिकृत वाळू वाहतूक सर्रासपणे सुरू असून प्रत्यक्षात अवैध अनधिकृत वाळू माफियावर प्रत्यक्ष पाहिजे त्या प्रमाणात कारवाई होत नाही.
दरम्यान, यावल व रावेर तालुका दोघं तहसीलदारांसह महसूल विभागातील सर्व कर्मचारी,तलाठी,कोतवाल, शिपाई यांच्यासह इतर संघटनांनी यावल रावेर तालुक्यातील वाळू माफियांवर कडक कारवाई करणे संदर्भात निवेदन देऊन कामकाजात अडथळा निर्माण करून प्रांताधिकारी कैलास कडलक व त्यांचे वाहन चालक यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने वाळू माफियांचा तीव्र निषेध केला आहे.