विवरा खु. कोरोनाचे तांडव तर विवरा बु. कोरोना मुक्त !
आज कोरोनाचा तिसरा बळी, विवरे खुर्दत कोरोनाने मृत्यूची हॅट्रीक
विवरा (प्रतिनिधी)। रावेर तालुक्यातील विवरा खुर्द येथील आज एकाच दिवसांत तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याने विवरा खुर्दत कोरोनाने मृत्यू ची हॅट्रीक केल्याने परिसरात घबराहत निर्माण झाली असून विवरा खुर्द मध्ये एकूण १५ रुग्ण कोरोना बाधित असून सर्व रुग्ण गोदावरी हॉस्पिटला उपचार घेत असताना त्यातील तीन रुग्ण वय ६०,६७,७५ या तिघे पुरुष रुग्णांचा आजच एकाच दिवशी कोरोनाने मृत्यू झाल्याने विवरा खुर्दमध्ये खळबळ उडाली आहे.
तसेच, त्याउलट विवरे बुद्रुक येथे आता पर्यंत ३२ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली होती, परंतु त्या ३२ रुग्णांन पैकी सर्व ३२ चे ३२ जण कोरोनाला धोबीपछाड देत कोरोनावर मात करून बरे होऊन सुखरूप घरी परतले आहे. यात प्रामुख्याने वयोवृद्ध ४ आजीबाई त्यात दोन ८९ वर्षांच्या व दोन ७५ वर्षीय असून एक ६७ वर्षीय आजोबांचा समावेश होता. रोगप्रतिकार शक्ती व जगण्याची प्रबळ इच्छा असेल, तर तो बरा होवू शकतो.नकारात्मकते पेक्षा सकारात्मक विचाराला प्राधान्य दया.याचे उत्कृष्ठ उदाहरण म्हणजे कोरोनाला मात देत परत आलेले पाचही वृद्ध…., त्यामुळे दोघे विवरे गावाची परिस्थिती वेगवेगळी असून विवरा खुर्दत कोरोनाचे तांडव तर विवरा बुद्रुक कोरोना मुक्त असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
विवरा बुद्रुक मध्ये कोरोनाला मात देत सुखरूप घरी परतलेल्या प्रत्येक रुग्णांचे पुष्पवृष्टी करून स्वागत करण्याचा उपक्रम माजी सरपंच वासुदेव नरवाडे यांनी हाती घेतला आहे. सदर उपक्रम हा कौतुकास्पद असून त्यांचे कौतुक केले जात आहे
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.