भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमपारोळा

विवाहितेचा विनयभंग; चुलत दिरांवर गुन्हा दाखल

पारोळा (प्रतिनिधी)। तालुक्यातील तरवाडे येथील एका २३ वर्षीय विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघ चुलत दिरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, सकाळी १ वाजता शनिवारी २८ नोहेंबर रोजी पीडित विवाहिता ही शेतातून घरी येत असतांना रस्त्यावर चुलत दिर मंगेश बुधा भराडी व संजय बुधा भराडी यांनी विवाहितेस आडवून मंगेश याने माझे तुझ्यावर प्रेम जुळले आहे. मला संबंध करू दे असे सांगून जवळीक करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्या ठिकाणावरून मी पळून गेली. व पती, चुलत सासरे यांना याबाबत माहिती दिली. नातेवाईक असल्याने पती व चुलत सासरे गुलाब जोगी हे त्यांना समजाविण्यासाठी आज सकाळी 8 वाजता गेले होते. त्याचे वाईट वाटून त्या दोघांनी पती व चुलत सासरे यांना दमदाटी करत चुलत सासरे यांना लाकडी दांडा डोक्यात मारून जखमी केले. विवाहिताने दिलेल्या फिर्यादी वरून दोघी भाऊ विरुद्ध विनयभंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!