भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमजळगाव

विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवत पळवून नेऊन अत्याचार

जळगाव (प्रतिनिधी)। येथील २२ वर्षीय विवाहितेस तरूणाने लग्नाचे आमीष देत पळवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडली असून याप्रकरणी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, शहरातील पीडित विवाहिता, पती व दोन मुलांसह वास्तव्यास असलेल्या परिसरात राहणारा आकाश दिनेश जाधव (वय २१) याचे विवाहितेसोबत गेल्या सहा महिन्यांपासून प्रेमसंबध होते. आकाशने विवाहितेस लग्नाचे आमीष दाखवत वारंवार तीच्यावर अत्याचार करीत होता. दरम्यान, ११ नोव्हेंबर रोजी याने विवाहितेस मांजरी (चंद्रपुर) येथे पळवून नेले व २५ नोव्हेंबरपर्यंत विवाहितेवर अत्याचार केल्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी जळगावात आणून सोडुन दिले ती विवाहिता टॉवर चौकात आल्यानंतर तीने तिच्या आईला फोन लावला. तिची आई याठिकाणी आली असता तिने तिच्यासोबत घडलेला संपुर्ण हकिकत आईला सांगितली. दरम्यान शहर पोलिसात ती विवाहिता हरविल्याची तक्रार दाखल असल्याने मंगळवारी ति विवाहिला शहर पोलीस ठाण्यात हजर झाली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात पिडीत विवाहितेच्या फिर्यादीवरून आकाश जाधव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!