व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द
मुंबई (प्रतिनिधी)। महाविकास आघाडी सरकारने विद्यार्थ्यांच्या संदर्भात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे. विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. त्यानुसार व्यवसायिक आणि बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाची/अंतिम सेमिस्टरच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि सध्याचे वातावरण अद्याप कोणतीही परीक्षा घेण्यास अनुकूल नसल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करुन दिली आहे.
Maharashtra Government has taken a decision to not conduct the final year/final semester examination of the non-professional courses as well as professional courses as the present atmosphere is not yet conducive to conduct any examination or classes. (1/3) pic.twitter.com/ddS0zTRXQb
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 26, 2020
यासह विद्यापीठाच्या सूत्रानुसार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एमडी, एमएस, डीएम आणि एमसीएच परीक्षा पुढे ढकलण्याचे निर्देश मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाला द्यावेत, अशी विनंती केली आहे.
AICTE, COA, PCI, BCI, NCTE & National Council For Hotel Management & Catering Technology to endorse the decision of the State Government regarding cancellation of final year/ final semester examinations of the Professional courses & issue guidelines to the Universities. (3/3)
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 26, 2020