भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

शासकीय कापूस खरेदी केंद्रावर गैरव्यवहार; समिती स्थापन

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदी केंद्रांवर मोठ्या प्रमाणात घोळ होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत असल्याने याचे निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी समिती स्थापन करून बैठक बोलावली आहे.

कापूस खरेदी प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहणे आवश्यक असल्याने तालुकास्थरावर गैरव्यवहार व वादाचे निवारण करण्यासाठी तालुका निबंधकाच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. अलीकडेच जळगाव जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली असता यात गैरव्यवहाराच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. खरेदी केंद्रांवर शेतकर्‍यांच्या आधी व्यापार्‍यांचा कापूस खरेदी करण्यात येत असल्याबाबत आरोप होत आहे. यंदा देखील टोकन पद्धतीने कापूस खरेदी करीत असल्याने शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक सुरूच आहे. तर कापूस कपातीच्या नावा खाली देखील लुट सुरूच आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी सीसीआय, पणन महासंघाचे प्रतिनिधी व जिल्हा उपनिबंधकांची बैठक बोलावली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!