शासकीय सुटीमुळे वाळूतस्करांना होळी, धुलीवंदनाची मोठी सुवर्णसंधी; तलाठी,सर्कल मुख्यालययी राहत नसल्याचा परिणाम
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल दि.30(सुरेश पाटील)। दि.27रोजी चौथा शनिवार दि.28 होळी आणि दि.29रोजी धूलिवंदन निमित्त शासकीय सुटी आल्याने तसेच यावल तहसीलदार वगळता काही महसुल अधिकारी,कर्मचारी आणि अनेक तलाठी,सर्कल हे आपल्या मुख्यालया ठिकाणी राहत नसल्याची सुवर्ण संधी साधून वाळूतस्करांनी अवैध वाळू वाहतूक खुलेआम करून ट्रॅक्टर सुसाट वेगाने पळवून मोठा उच्चांक गाठला यावल पोलीस सुद्धा दिवस-रात्र बंदोबस्त करून सकाळी तीन ते सहा वाजेच्या दरम्यान साखर झोपेत राहत असल्यामुळे वाळू तस्करांना पोषक वातावरण निर्मिती झाली होती.तरी आता महसूल आणि पोलिस विभाग नेहमीचे शासकीय कामकाज करताना वाळूतस्करां विरुद्ध काय कडक कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहे.
यावल तहसील कार्यक्षेत्रात तसेच यावल व फैजपूर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात कोळन्हावी डांभुर्णी किनगाव, मनवेल थोरगव्हाण साकळी,वड्री सातोद कोळवद,भालशिव बोरावल टाकरखेडा पिप्री, पाडळसे बामणोद भालोद आमोदा न्हावी फैजपुर, हिंगोंणा सांगवी परिसरात वाळू माती इत्यादी गौण खनिजाची अनेक ट्रॅक्टर, डंपर मालक-चालक अनधिकृतपणे सर्रास वाळू वाहतूक करीत आहे यात यावल तालुक्यातील अनेक नद्या-नाल्यातील वाळूचा लिलाव अधिकृतपणे झालेला नसताना अवैध वाळू वाहतूक होतेच कशी? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत बोरावल टाकरखेडा परिसरातून वाळू वाहतूक करणाऱ्यां ट्रॅक्टर चालकाकडून एका मंदिराचे बांधकाम सुरू असल्याने संबंधित त्या ठिकाणी वाळूचे भरलेले ट्रॅक्टर थांबवून, अडवून प्रति ट्रॅक्टर दोनशे रुपये अनधिकृतपणे वर्गणी वसूल करीत आहेत हे सुद्धा संपूर्ण महसूल आणि पोलिस विभागाला एक आव्हान आहे,म्हणजेच अवैध वाळू वाहतूक दारांना ग्रामस्थांचा सुद्धा पाठिंबा असल्याचे उघड झाले आहे.
वरील शासकीय सुट्ट्यांचे निमित्त साधून यावल परिसरातील अवैध वाळू वाहतूक दारांनी(काही ट्रॅक्टर चालकांनी तर एका ट्रॅक्टरला 2 ट्रॉली जोडून)खुलेआम रात्रीच्या वेळेस म्हणजे सकाळी दोन ते सहा वाजेच्या दरम्यान अवैध वाळू वाहतूक करून ट्रॅक्टर ट्रॉली सह सुसाट वेगाने पळवून मोठा गोंधळ घालत असतात यामुळे विकसित भागातील नागरिकांची सकाळची साखरझोपमोड़ होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.तालुक्यातील अनेक सर्कल आणि तलाठी(यावल तलाठी वगळता) हे आपल्या मुख्यालया ठिकाणी रहात नसल्याने तसेच पोलीस सुद्धा दिवस आणि रात्री उशिरापर्यंत गस्त घालून सकाळी दोन ते सहा वाजेच्या दरम्यान झोप घेत असल्याने अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टर पाहिजे त्या सोयीच्या रस्त्याने सुसाट वेगाने धावत असतात तरी यावल महसूल आणि पोलिसांनी संयुक्त मोहीम राबवून यावल शहरात विकसित भागात वाळूचे ट्रॅक्टर येतात कुठून? आणि जातात कसे? याबाबत कडक निर्बंध लावून कारवाई करावी असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.