श्री.आ.गं हायस्कुल व श्री.ना.गो पाटील कनिष्ठ महाविद्यालय
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहभेटीचा छोटेखानी मेळावा संपन्न
सावदा (प्रतिनिधी)। येथील श्री आ ग हायस्कुल व ना गो पाटील कनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा एक छोटेखाणी स्नेहभेटीचा मेळावा संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा श्री प्रा व पु होले हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्राचार्य श्री सी सी सपकाळे सर ,श्री एस वाय सरोदे सर, श्री ए एम वाणी सर, श्री एस एम महाजन सर,आणि श्री नंदू पाटील सर हे होते.
सदर कार्यक्रम हा वर्ष २००६ या वर्षी शिकत असलेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी आयोजित केला होता. दिवाळीची सुटी आणि कोरोना च्या प्रादुर्भाव काळात सर्व जण आपल्या गावाकडे घरीच होते. हे औचित्य साधूंना विद्यार्थ्यांनी एकमेकांना संपर्क साधून या कार्यक्रमाची एक रूपरेषा तयार केली. आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन काही वेळ आपल्या शिहकांसोबत घालवू या असे ठरवले आणि त्यानुसार नियोजन झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सेवानिवृत्त शिक्षक श्री पी डी वारके सर यांचे निधन झाल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व अत्यंत साधेपणाने हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री नंदू पाटील यांनी करून सम्पूर्ण कार्यक्रमाची सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. या प्रसंगी उपस्थित सर्व शिक्षकांचा शाल श्रीफळ आणि बुके देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला.
जमलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी यावेळी आपला परिचय करून आपण सध्या काय करतो, आपल्या कामाचे स्वरूप आणि आपले कार्यक्षेत्र व त्याचबरोबर शाळेविषयी आणि शिक्षकांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्यात. या भावना व्यक्त करताना सुख ,दुःख,आनंद ,समाधान, कृतज्ञता,उपकार अशा संमिश्र भावनांनी वातावरण भारावून गेले होते. एकाच छताखाली ,एकाच शाळेतील इतक्या विविध क्षेत्रातील काम करणारे विद्यार्थी पाहून शिक्षकांच्या चेऱ्यावरील आनंद आणि समाधान ओसांडून वाहात होते.
यानंतर श्री सी सी सपकाळे सर, श्री एस एम महाजन सर ,श्री नंदू पाटील सर यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. अध्यक्षीय मनोगतात श्री प्रा व पु होले यांनी अतिशय सुंदर आणि खिळवून ठेवणारे आपले विचार प्रकट केले.या मध्ये त्यांनी आपले व्यक्तिमत्त्व कसे असावे,आपण कसे वागले पाहिजे, आणि सर्वात महत्वाचे जन्माला आलोय तर इतरांच्या कामास या इतरांना मदत करा. असे आवाहन करून सर्वांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात. आभार लोकेश टोके यानि व्यक्त केल्यात आणि स्नेहभोजन घेऊन नंतर कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमात पन्नास विद्यार्थी सहभागी झाले होते. कोचुर रोडवरील नगरपालिका बहुउद्देशिय सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी लोकेश टोके,स्वप्नील चौधरी, पंकज पाटील,बंटी जंगले,अमित पाटील,विशाल पाटील,राहुल बेंडाळे, महेंद्र नेमाडे, किरण लोमटे, राहुल धांडे, भरत येवले,रुपेश जैन आदिंनी सहकार्य केले.