साकळी प्रा.आ.केंद्रांतर्गत कोरोना आरटीफीसीआर स्वॅब तपासणी शिबिरात 4 कोरोनाबाधित रुग्ण आढ़ळले !
ग्रामस्थांकडून सहकार्याची अपेक्षा - आरोग्य प्रशासन
यावल (प्रतिनिधी)। साकळी गांवासह परिसरातील कोविंड-१९ या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता साकळी प्रा.आ. केंद्राअंतर्गत येणाऱ्या साकळी,शिरसाड इतर काही गावांमधील विविध व्यवसायिकांचे साकळी ता. यावल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य पथकाकडून कोरोना आरटीफीसीआर स्वॅब घेण्यात आले.
यात वस्तू व सेवा देणारे किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते, फळविक्रेते, दुध संकलन केंद्रातील दूध विक्रेते व इतर व्यवसायिक तसेच गांवात असलेल्या इतर सर्व तापाच्या रुग्णांची व अनेक व्यक्तींच्या संपर्कात येणाऱ्या अश्या सर्व व्यक्तींची आशा सेविकांनी नोंद घेऊन त्यांचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे व वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती कवडीवाले व डॉ.सागर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साकळी येथे दि.४ रोजी पासून विशेष कॅम्प घेतले जात आहे.यात दि.४ रोजी सात,दि.५ रोजी 14 तर दि.६ रोजी 27 जणांचे स्वॅब घेण्यात आलेले आहे. तर दि. ७ रोजी १९ व्यक्तींची अँटिजन रॅपिड टेस्ट ने तपासणी करण्यात आली. आरोग्य कर्मचारी मालती चौधरी, संजय अहिरराव यांनी स्वॅब घेण्याचे काम करीत असून त्यांच्या मदतीला आरोग्य सेवक शिंदे, आरोग्य सेवक शेख सलाउद्दीन,आरोग्य सहाय्यक पारधे, लॅब टेक्नीशियन मेहराज हे कर्मचारी हजर आहे. दि.७ रोजी ज्या व्यक्तींचे अँटिजन स्वॅब घेतले होते त्या रुग्णांपैकी तब्बल 4 जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले आहे. हे सर्व जण शिरसाड ता.यावल येथील असून त्यांना तात्काळ फैजपूर येथील कोविड सेंटरला पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्य प्रशासनाकडून कळविण्यात आलेली आहे. बऱ्याच दिवसानंतर परिसरात नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने साकळी परिसरातील ग्रामस्थांमध्ये आरोग्याबाबत चिंता वाढली आहे. नागरिकांनी सहकार्य करावे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या साकळी प्रा.आ.केंद्रात नागरिकांच्या सोयीसाठी कोरोना आरटीफीसीआर स्वॅब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्यांना जास्त ताप असेल त्यांनी तात्काळ केंद्राशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी विशेषतः जे व्यवसायिक आहे त्यांनी ही न घाबरता तपासणी करून घ्यावी जेणेकरून आपले सर्वांचे आरोग्य सुरक्षित राहील. विशेषतःसाकळी येथील व्यवसायिक नागरिकांनी तपासणी करून घ्यावी. त्याचप्रमाणे खाजगी व्यवसायिक डॉक्टरांनी अतितापाच्या रुग्णांना आरोग्य केंद्राकडे तपासणीसाठी पाठवावे तरी सर्वांनी आरोग्य प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वाती कवडीवाले यांनी केलेले आहे.