साकेगावात दाम्पत्याचा मुलीसह आत्महत्येचा प्रयत्न,दोन ठार एकाची प्रकृती गंभीर !
भुसावळ। येथून जवळच असलेल्या साकेगाव येथील दाम्पत्याने आपल्या अडीच वर्षाच्या मुलीसह रेल्वे खाली आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली . यात आई व मुलगी जागीच ठार झाली असून पुरूष गंभीर जखमी झाला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की साकेगाव येथील रहिवासी हरीश शिरीष चौधरी (वय अंदाजे ३७) यांनी आपली पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलीसह रेल्वेखाली आत्महत्येचा प्रयत्न केला. यात त्यांची पत्नी आणि मुलगी जागीच ठार झाले असून हरीश चौधरी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सदरील घटना आज सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे
. दरम्यान, हा आत्महत्येचाच प्रकार असून या कुटुंबाने हे टोकाचे पाऊल कशासाठी उचलले याची माहिती अद्याप स्पस्ट झालेली नसल्याने अनेक तर्क वितर्क मांडले जात आहे.