भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

साधा अर्ज माहिती अधिकारात वर्ग करून अर्जदारास दमदाटी; यावल नगरपरिषद माहिती अधिकाऱ्याचा प्रताप,आणि मनमानी !

यावल, सुरेश पाटील (प्रतिनिधी)। अर्जदाराने यावल नगर परिषदेकडे एक साधा अर्ज देऊन मिळकतीच्या दाखल्याची प्रमाणित प्रत मिळणेसाठी मागणी केली असता माहिती न देता यावल नगरपरिषद कार्यालयातील जन माहिती अधिकारी यांनी माहिती न देण्याच्या अशुद्ध हेतूने माहिती अधिकार कायद्याअंतर्गत तो अर्ज वर्ग करून माहिती देण्यास लेखी नकार देऊन आपला प्रताप आणि मनमानी करून अर्जदारास दमदाटी करण्याची घटना यावल नगरपरिषदेत घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की सुनील छगन कुंभार राहणार यावल यांनी दिनांक 7 जुलै 2020 रोजी यावल नगर परिषदेकडे एक साधा लेखी पोच अर्ज देऊन (माहिती अधिकारात नव्हे) त्याचे वडील छगन दगडू कुंभार यांचे नांवाने दिनांक 18 जानेवारी 2019 रोजी यावल येथील सि.सर्वे नं. 3356 / अ / 2 बाबत खरेदी-विक्री व्यवहारासाठी दाखला मिळणेसाठी अर्ज दिला होता. त्या अर्जाची नगरपरिषद यावल यांनी दिनांक 20 जानेवारी 2019 रोजी जागा वर्णनाचा दाखला दिलेला आहे. त्या जागा वर्णन दाखल्याची प्रमाणित प्रत सुनील छगन कुंभार यांनी मागितली होती आणि आहे. परंतु यावल नगर परिषद कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याने जागा वर्णनाचा दाखला न दिल्याने अर्जदारास महत्वाचे शासकीय काम असल्याने अर्जदार सुनील कुंभार यांने पुन्हा दिनांक 27 जुलै 2020 रोजी यावल तहसीलदार आणि यावल नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज देऊन यावल नगर परिषदेतील संबंधित अधिकारी बयाणी हे अरेरावीची भाषा करून दाखल्याची प्रमाणित प्रत देणार नाही तुमचेने जे होईल ते करा अशी धमकी दिली असे अर्जात नमूद करून यावल न.प.ने दोन दिवसात प्रमाणित प्रत देणेबाबत मागणी केली होती.

दिनांक 27 जुलै 2020 रोजी यावल तहसीलदार आणि यावल मुख्याधिकारी यांना लेखी पत्र दिल्यानंतर त्याच दिवशी यावल नगर परिषद कार्यालयातील जन माहिती अधिकारी बयाणी यांनी अति कर्तव्यदक्षता दाखवून त्याच दिवसांची दिनांक 27 जुलै 2020 टाकून सुनील छगन कुंभार यांनी दिलेल्या दिनांक 17 जुलै 2020 चे अर्जाचा संदर्भ देऊन अर्जदारास लेखी पत्र देऊन मागितलेली माहिती वैयक्तिक स्वरूपाची माहिती विचारली असल्याने माहिती अधिकार अधिनियम 2005 मधील तरतुदीनुसार व्यापक जनहिताशी संबंधित नसलेली वैयक्तिक स्वरुपाची माहिती पुरविता येणार नाही तसेच सदर अर्ज हा ड वर्गवारीत येत असल्याने त्याचा कालावधी 1 वर्षापेक्षा जास्त झालेला आहे असे लेखी पत्र देऊन माहिती नाकारली आहे. दिनांक 17 जुलै 2020 रोजी अर्जदाराने साधा अर्ज दिलेला होता तो अर्ज यावल नगर परिषद कार्यालयातील जन माहिती अधिकारी बयाणी यांनी माहिती अधिकारात कोणत्या नियमानुसार वर्ग केला आणि अर्जदारास माहिती का नाकारली हा कायदेशीर प्रश्न उपस्थित होत असल्याने यावल नगरपरिषद कार्यालयातील जन माहिती अधिकारी बयाणी यांना याचा जाब द्यावा लागणार असल्याचे यावल शहरात बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!