साने गुरुजी माध्यमिक विद्यालयातील व्यवसाय शिक्षणाचे विद्यार्थी आले राज्यस्तरावर..दुसरा क्रमांक व नाशिक विभागात प्रथम क्रमांक !
यावल (प्रतिनिधी)। दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा यावल नगर परिषद व्दारे संचलीत सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,यावल येथील व्यवसाय शिक्षणातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर बाजी मारलेली आहे.विद्यार्थ्यांनी घेतलेली विषय आवड आणि चिकाटी तसेच कठोर मेहनतीच्या बळावर अभिनंदनास पात्र झालेले आहेत..तसेच मल्टीस्किल व ऑटोमोबाईल विषयांचा निकाल 100% लागलेला आहे
निकाल खालीलप्रमाणे-
इयत्ता:12वी लेव्हल4 (मल्टिस्किल-इलेक्ट्रिकल टेक्निशियन)–
1. कु.रुकसाना गबाब तडवी (गुण:99/100)-राज्यस्तरावर विषयात दुसरा क्रमांक व नाशिक विभागात प्रथम क्रमांक तसेच शाळेतून मल्टिस्किल विषयात प्रथम
2.अक्षय अविनाश पाटील (गुण:98/100)
कु.काजल ज्ञानेश्वर कोळी (गुण:98/100)
3.कुंदन किशोर सुतार (गुण97/100)
सागर महेंद्र मोरेकर (गुण:97/100)
इयत्ता: 12 वी लेव्हल-4 (ऑटोमोबाईल सर्व्हिस टेक्निशियन)–
1.विनीत सुधाकर झोपे(गुण:92/100)- शाळेतून ऑटोमोबाईल विषयात प्रथम
2.समीर रमजान तडवी (गुण:91/100)
3.प्रतीक उत्तमराव निळे (गुण: 90/100)
राज्यस्तरावर पात्र झालेले विद्यार्थी तसेच शालेय स्तरावर विषयात प्रथम ,द्वितीय तसेच तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचे तसेच सर्व मल्टिस्किल व ऑटोमोबाईल मधील विद्यार्थ्यांचे मिळालेल्या यशाबद्दल खूप खूप अभिनंदन..