भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

सार्वजनिक शौचालयाचा निधी स्वतःच्या घशात “सबका साथ सबका विकास “यावल तालुक्यात मोठा भ्रष्टाचार,,,,,,,,,,!

यावल(प्रतिनिधी)। यावल तालुक्यात पंचायत समितीच्या माध्यमातुन स्वच्छता अभियान अंतर्गत शासना कडून ग्रामीणभागासाठी मोठ्याप्रमाणावर अनुदान म्हणून निधी दिला जातो हा निधी गैरमार्गाने स्वात:च्या घशात घातला जातोय.

संपुर्ण देशात स्वच्छता अभियानाचा सर्वत्र उपक्रम राबविला जतो या करिता ग्रामीण भागा साठी मोठया प्रमाणावर निधी दिला जातो त्या नुसार राज्यात सुद्धा स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी शासनाच्या वतीने लाखो रुपयांची निधी गावपातळीवर सार्वजनिक शौचालय बांधणीसाठी मिळत असतो मात्र यावल तालुक्यातील ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात ही स्वच्छता योजना राबवितांना सर्व शासनाचे नियम धाब्यावर बसुन पंचायत समितीचे ग्राम विस्तार अधिकारी, ठेकेदार आणि शाखा अभियंता हे सर्व मिळून ” सबका साथ सबका विकास ” या प्रमाणे तालुक्यात विविध ग्रामपंचायतच्या परिसरासह गाव पातळीवर सार्वजनिक शौचालयांची थातुर-मातुर व अपुर्ण कामे कागदोपत्री पुर्ण दाखवुन पुर्ण बिले काढली जातात

तसेच या योजनांच्या काही कामांचे आदेश मिळण्या आधी काही अधिकारी हे आपल्या मर्जीतील लोकांकडून कामे सुरू करून घेतात .अशा कामांना मान्यता मिळवुन घेण्यासाठी शाखा अभियंतापासुन तर जिल्हा परिषदच्या वरिष्ठापर्यंत आर्थिक देवाण-घेवाण करून बिले तयार करीत असुन यावल तालुक्यातीत मांगी -करंजी, लिघुरी, वढोदा, मानवेल,बोरावल,टाकरखेडा, अट्रावल, भालोद, मायसांगवी, निमगाव, डोंगर कठोरा, हंबर्डी, बोरखेडा बु॥ आणी खुर्द चिखली बु॥, चिखली खु॥ , थोरगव्हाण आणी चुंचाळे आदी ग्रामपंचायती मधील कार्यक्षेत्रात सार्वजनिक शौचालयाची कामे अपुर्ण अवस्थेत सोडलेली असताना कामांची बिले मात्र ठेकेदारांनी काढुन घेतलेली असून अशा प्रकारे शासनाच्या निधीचा गैरवापर करणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी यावल तालुक्यातील ग्राम पंचायत आणी ठेकेदार यांनी संगनमताने १४ व्या वित्त आयोगाच्या प्राप्त झालेल्या निधीत देखील गैरवापर झालेला असुन, शासनाच्या निधीसह २०% ग्रामपंचायत निधी मध्येही बोगस बिले दाखवुन मोठया प्रमाणावर आर्थीक अपहार केलेला असून या सर्व कारभाराची तात्काळ चौकशी व्हावी अशी मागणी केली जात आहे ,

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!