सावदा येथे रविवार पेठ परिसरात कोरोनाचा शिरकाव , 1 रुग्ण बाधित !
सावदा ता. रावेर (प्रतिनिधी) आज आलेल्या कोरोना तपासणी कोरोना बधित रुग्णांच्या अहवालात 1 रुग्णांची भर पडली असुन सदरील रुग्ण रविवार पेठ परिसरातील 87 वर्षीय पुरुष आहे. बऱ्याच दिवसांपासून शहरातील कुठलीही व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली नव्हती त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला होता. परंतु सदरील घटनेने सावदा शहरात चिंतेचे वातावरण आहे. तरी रविवारी पेठ या परिसरातही कोरोनाने शिरकाव केला आहे. सदरील घटनेने परिसराच्या व सावदा वासीयांना पुन्हा चिंतेत टाकले असून रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना कॉरटाईन करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. परिसर सॅनिटाईझ करण्यात येत आहे कंटेनमेट झोने ची संख्या 9 झाली आहे.
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या 36 झाली आहे त्यात 6 मयत, 1 रुग्ण उपचार घेत आहे तर बाकी सर्व कोरोनाला मात देत घरी परतले आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.