सावदा शहरात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
सावदा (प्रतिनिधी)। सावदा येथे कोरोनाचे दुसऱ्या लाटेत अनेक रुग्ण निघत आहे, दिवसागणिक यात वाढ होत आहे, वेळीच योग्य उपचार मिळत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागत आहे अश्या स्थितीत सावदा सारख्या मोठ्या नगरपालिका क्षेत्रात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी एका निवेदना द्वारे करण्यात आली आहे ,यात शहरात कोविड सेंटर उभारणे साठी परवानगी मिळावी अशी मागणी प्रांतअधिकारी फैजपूर यांचे कडे करण्यात आली असून किंवा शासना तर्फे ते सुरू करण्यात येत असल्यास यात लोकसहभागातून यात मदत देण्यास तयार असल्याचे सांगितले असून येथे सुमारे 50 बेड चे कोविड सेंटर उभारण्याची मागणी एका निवेदना द्वारे करण्यात आली आहे,
या निवेदनावर नगरसेवक राजेंद्र चौधरी यांचे सह विनोद नेमाडे, मनीष भंगाळे, सुभाष माळी, यशवंत वाघूळदे, सागर चौधरी, सागर पाटील, प्रकाश नेमाडे, विवेक भंगाळे, शेख अजीम शेख खालील, रवींद्र नारखेडे यांचे सह असंख्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत व लवकरच येथे सदर कोविड सेंटर सुरू करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.